फार्मसी महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिवस साजरा

फार्मसी महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिवस साजरा
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालयात ग्रंथपाल श्री.सुजित अमळकर व शिवाजी पाटील यांनी पुस्तकांचे पुजन केले.
प्राचार्य डाॅ. रविन्द्र सोनवणे यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयास रू ११०००/- देणगी स्वरूपात दिले. तसेच धार्मिक, अभ्यासप्रणाली उपयुक्त व स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके देणगीच्या स्वरूपात प्राचार्य डाॅ. रविन्द्र सोनवणे, प्रा.देवेश भावसार प्रा.सतिष ब्राम्हणे यांनी पुस्तक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील ग्रंथालयात दिली.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.रविन्द्र माळी,प्रा.अनिल बोरसे प्रा.प्रितम पाटील, प्रा.प्रफूल्ल चव्हाण,प्रा.स्वप्नाली महाजन, प्रा.सुनिता चोपडे,प्रा.वर्षा पाटील प्रा. छाया महाजन, प्रा. शिवानी शर्मा, प्रा.वैशाली कुलकर्णी, प्रा.गीतांजली पाटील, प्रा.प्रगती पाटील, प्रा.प्रियंका महाजन तसेच अनिल महाजन, कविता शिंपी, महेश सोनजे, ज्ञानेश्वर चौधरी,अतूल साळुंके, प्रकाश पाटील, जगदीश सोनवणे, यश शिंपी, किशोर बुलके व कैलास कड यांची उपस्थिती लाभली.
पदवी, पदविका अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.संदेश बी. गुजराथी फार्मसी विभागाचे चेअरमन मा.योगेशजी मुंदडे,खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पी. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी केले आहे.