Breaking
ब्रेकिंग

विद्यार्थ्यांनी दातांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे – डॉ. उद्धव शिंदे

0 8 6 5 0 8

विद्यार्थ्यांनी दातांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे – डॉ. उद्धव शिंदे

‘स्नेहबंध’ फौंडेशन व साई डेंटल चा उपक्रम

प्रतिनिधी : आसावरी वायकर

अहिल्यानगर : विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून लहानपणापासूनच दातांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.

स्नेहबंध सोशल फौंडेशन, इंडियन डेंटल असोसिएशन व साई डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडारवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत दंतचिकित्सा तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता घोडके तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

या शिबिरात साई डेंटल क्लिनिकचे डॉ. अतुल मडावी यांनी विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली. यावेळी डॉ. ओंकार भालसिंग व डॉ. शिल्पा इमुनवार यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना दातांची किड ओळखण्यासाठी ‘ट्रॅफिक सिग्नल’ पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. या पद्धतीत हिरवा, पिवळा व लाल सिग्नलच्या माध्यमातून दातांच्या स्थितीबाबत सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली.

यावेळी डॉ. अतुल मडावी यांनी सांगितले की, समाजातील काहीशा दुर्लक्षित घटकांतील विद्यार्थ्यांना योग्य वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मौखिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी लहानपणापासून दातांच्या स्वच्छतेची सवय लावून घ्यावी.

या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता कशी राखावी, दातांच्या समस्या कशा ओळखाव्यात तसेच नियमित तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे