Breaking
ब्रेकिंग

अमळनेर फार्मसी महाविद्यालयात गणेशोत्सव २०२५ जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा*

0 8 6 5 2 1

*अमळनेर फार्मसी महाविद्यालयात गणेशोत्सव २०२५ जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा*

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षी देखील खान्देश शिक्षण मंडळ संचलित फार्मसी महाविद्यालयात सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृन्द व विद्यार्थी यांचे उत्स्फूर्त सहभागाने भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव २०२५ निमीत्त क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विवीध उपक्रमांचे आयोजन करुन
दि. २७ ते३१ ऑगस्ट दरम्यान गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
दि.२७ रोजी महाविद्यालयीन कर्मचारी सौ. कविता व श्री हर्षवर्धन शिंपी यांचे शुभहस्ते श्री. गणेशमूर्ती स्थापना करण्यात आली.दि.२८ रोजी शिक्षक, शिक्षकेतर ‘ कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी या सर्वांचा सहभाग असणाऱ्या’विवीध संघाच्या साखळी पध्दतीने क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.दि.२९व३० रोजी संस्कृती या समर्पक उपक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य,गायन, एकांकिका, पारंपारिक वेषभूषा, इ.कलाविष्कारांनी आपल्यात असणाऱ्या सुप्तगुणांचे खुप कल्पकतेने सादरीकरण केले. विशेष म्हणजे महाविद्याल यीन शिक्षकेतर कर्मचारी श्री. ज्ञानेधर चौधरी यांनी देखील नृत्य सादर करुन सर्व प्रेक्षकांना आनंदीत करुन वातावरणात जल्लोष निर्माण केला. खा.शि. मंडळाचे सर्व विद्यमान संचालक, सर्व शिक्षकव शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यानी एकत्रपणे सात्विक भोजनाचा लाभ घेतला आणि विशेष म्हणजे महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी श्री. अनिल महाजन, श्री
सुजित अमळकर,श्री.जगदीश सोनवणे, श्री. जितेन्द्र पाटील, श्री. शिवाजी ‘ पाटील, श्री. पंकज पवार, श्री महेश सोनजे, श्री. प्रकाश पाटील, श्री. किशोर बुलके, श्री.अतुल पाटील, श्री. प्रशांत चौधरी, श्री. कैलास कड, श्री. यश शिंपी, श्री. रोहीत मकवाना व इतर सहकाऱ्यांनी भोजन व्यवस्था सुरळीतपणे हाताळली.
दि.३१ रोजी महाविद्यालयातील शिक्षीका सौ. प्रियांका व श्री. किशोर महाजन साळुंखे यांचे शुभहस्ते श्री. सत्यनारायण भगवान महापूजा करुन विघ्नहर्ता गणपती बाप्पाने असेच आशिर्वाद सदैव ‘देऊन फार्मसी महाविद्यालयाची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा, सर्व उपक्रम वर्षानुवर्षे पार’ पडत राहो असे साकडे घालून श्री. विसर्जन केले.
गणेशोत्सव २०२५ चे फार्मसी
सुनियोजनासाठी महाविद्यालयाचे चेअरमन व खा.शि. मंडळाचे विद्यमान संचालक श्री.योगेश मूंदडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे यांनी प्रा. रविन्द्र माळी, प्रा. देवेश प्र. भावसार, व प्रा. सतिष ब्राम्हणे यांची समन्वयक म्हणून नेमणूक तसेच.
महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रत्येक वर्गातील निवडक विद्यार्थी यांचा समावेश असणाऱ्या विवीध समिती तयार करुन प्रत्येक सभितीने करावयाची कामे व जबाबदारी वेठोवेळी सभा घेऊन सवांना अवगत करुन नियमीतपणे पाठपुरावा केला. प्रा.देवेश भावसार, प्रा. सतिष ब्राम्हणे, प्रा. अनिल बोरसे खजिनदार श्री. विनय ब्रम्हे यांनी सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे हाताळून व काटकसरीने’ खर्चाचे नियोजन केले.
पदवी व पदविका विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेळोवेळी मिळालेले ‘ मोलाचे मार्गदर्शन, पदवी व पदविका अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी यांचे अथक परिश्रमांच्या सहकायाने गणेशोत्सव २०२५ निर्विघ्नपणे, भक्तीमय वातावरणातव जल्लोषात साजरा करण्यात आला.
खा.शि मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष डाॅ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए.निरज अग्रवाल, फार्मसी विभागाचे चेअरमन श्री योगेश मुंदडे, विद्यमान संचालक श्री. प्रदिप अग्रवाल, श्री. आण्णासाो हरी भिका वाणी, डॉ. अनिल शिन्दे, खा.शि. मंडाळाच्या उपाध्यक्षा श्रीमती माधुरी पाटील, सचिव प्रा.पराग पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन सर या सर्वानी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पदविका व पदवी विभागातील सर्व विद्यार्थी यांचे या निमीत्ताने अभिनंदन करुन खान्देश शिक्षण मंडळाची गुणवत्तेची, सुस्कृततेची व एकजूटतेची परंपरा यापढे अखंडीतपणे सुरु ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे