शिक्षक भारती आंदोलन छेडणार- महेश पाडेकर
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यां विरोधात आंदोलन
शिक्षक भारती आंदोलन छेडणार- महेश पाडेकर
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यां विरोधात आंदोलन
राहुरी वृत्तसेवा / प्रतिनिधी : जावेद शेख
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे एकमेव कारण म्हणजे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वर्षानुवर्षी दबा धरून बसलेले भ्रष्ट अधिकारी, लिपिक यांचे तात्काळ बदली करून प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नाही, वर्षानुवर्षी फाईल कार्यालयात पडून राहतात, शासन मान्य संघटनेच्या निवेदनांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली जाते, त्यामुळे त्यांच्यावर दप्तर दिरंगाई अंतर्गत कारवाई करून बदली होत नाही त्यासाठी शिक्षक भारती संघटना शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे असंतोष आंदोलन करणार आहे असे प्रतिपादन शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर यांनी केले माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आय.डी., वैयक्तिक, अर्धवेळ मान्यता, सी.एच.बी. मान्यता, संच मान्यता करताना प्राचार्य, कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे, वेतन निश्चिती मेडिकल व थकीत देयके,घडाळी तत्वावरील काम करणारे शिक्षकांचे मानधन तीन वर्षापासून अदान न करणे, राष्ट्रीय सेवा योजनेचा निधी न देणे शालाबाह्य कामे देणे, एन.पी.एस., डी.सी.पी.एस. पेन्शन चा हिशोब पावत्या न देणे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर न करणे, एकस्तर वेतन श्रेणीसाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे अशा विविध प्रश्न प्रलंबित असून शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी जबाबदार आहे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक त्रास देऊन आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय कुठलेही काम होत नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात एजंटचा वावर शिक्षण उपसंचालक कार्यालयात पुणे येथे असल्याने संघटनेने या आधी दोन वेळेस निवेदन देऊनही संबंधित कर्मचारी त्याच कार्यालयात कार्यरत असल्याने शिक्षक भारती संघटना अहमदनगर यांचे शिक्षण आयुक्त पुणे कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करणार आहे अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर यांनी सांगितले तसेच प्रभारी शिक्षण उपसंचालक हरुण अत्तार यांच्याकडे देखील तोंडी माहिती दिली असून त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे महिनाअखेरीस आंदोलन छेडणार आहे या आंदोलनास राज्य सचिव सुनील गाडगे,जिल्हाध्यक्ष रामराव काळे, सरचिटणीस महेश पाडेकर, महिला जिल्हाध्यक्षा रूपाली कुरुमकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे ,तालुका अध्यक्ष संजय सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, संजय भालेराव, नानासाहेब खराडे, रूपालीताई बोरुडे, मफीज इनामदार,कल्पना चौधरी, अकील फकीर आदी पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे.