Breaking
ब्रेकिंग

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन:- प्रशांत ढाळे (नगरसेवक करमाळा) 

0 8 6 6 4 8

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन:- प्रशांत ढाळे (नगरसेवक करमाळा) 

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १३/गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष नगरसेवक प्रशांत ढाळे यांनी दिली आहे. करमाळ्यातील वेताळ पेठ येथील संजीवनी हॉस्पिटल येथे हे शिबिर होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आरोग्यविषयक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या आरोग्याची तपासणी करून घेता यावी, विविध आजारांचे प्राथमिक स्तरावर निदान व्हावे तसेच गरजू रुग्णांना आवश्यक उपचाराबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हे शिबिर घेण्यात येणार आहे.

या शिबिरात बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये हिमोग्लोबिन (HB), रक्तातील साखरेची HbA1c तपासणी, KFT, LFT, कोलेस्ट्रॉल, Lipid Profile, थायरॉईड यांसह विविध आवश्यक तपासण्या करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या मोफत सुविधेचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच सकाळी १० ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान मोतीबिंदू आढळून आलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार पुढील उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह नेत्रविकाराची समस्या असलेल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी सांगितले.

या आरोग्य उपक्रमासोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे पात्र रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू म्हणून टेबल फॅन देण्यात येणार आहे.

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून यापूर्वीही सामाजिक व जनहिताचे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आरोग्यसेवेचा हा उपक्रम राबवून नागरिकांना मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांना प्रतिसाद दिल्यास त्याचा मोठा फायदा गरजू नागरिकांना होऊ शकतो. मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरात करमाळा शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच पात्र नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे