चांदेकसारे येथे आरोग्य शिबिरात महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
ग्रामपंचायत च्या वतीने ॲनिमिया मुक्त गाव अभियान

चांदेकसारे येथे आरोग्य शिबिरात महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
*ग्रामपंचायत च्या वतीने ॲनिमिया मुक्त गाव अभियान*
राहुरी तालुका जावेद शेख
आरोग्य ही एक व्यापक संकल्पना असून महिलांनी शारीरिक व मानसिक दृष्ट्या आरोग्यसंपन्न असावे व दैनंदिन जीवनात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी केले. चांदेकसारे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत च्या वतीने एकदिवसीय सर्वरोगनिदान व आरोग्य शिबिर पार पडले त्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, प्रशांत तोरवणे,आरोग्य विस्तार अधिकारी डॉ.पथवे,लोकनियुक्त सरपंच किरण होन, ग्रामविकास अधिकारी संजय दुशिंग, उपसरपंच वसिम शेख, माजी उपसरपंच सचिन होन, समुदाय आरोग्य अधिकारी सौ.डॉ.नागरे,सीआरपी वंदना जाधव, प्रमिला भालेराव व सर्व आशासेविका,अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी संदीप दळवी पुढे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुक्यात सर्व ठिकाणी ॲनिमिया मुक्त मोहीम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत सर्वरोगनिदान व आरोग्य शिबिर राबवले जात आहे. चांदेकसारे ग्रामपंचायत ने महिलांसाठी राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून गावातील सर्व महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा व आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि आपले गाव ॲनिमिया मुक्त ठेवावे.
याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी संजय दुशिंग, लोकनियुक्त सरपंच किरण होन,उपसरपंच वसिम शेख, माजी उपसरपंच सचिन होन यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिर प्रसंगी मोठ्या संख्येने महिलांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.शिबिराचे प्रास्तविक समुदाय आरोग्य अधिकारी सौ.डॉ.नागरे यांनी केले व आभार सीआरपी वंदना जाधव यांनी मानले.



