Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्यस्तरीय मिक्स-बॉक्सिंग रेफ्री सेमिनार २०२५ यशस्वीरित्या संपन्न

0 8 6 7 1 3

*महाराष्ट्र राज्यस्तरीय मिक्स-बॉक्सिंग रेफ्री सेमिनार २०२५ यशस्वीरित्या संपन्न*

राहुरी तालुका जावेद शेख

रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी ॲमॅच्युअर मिक्स बॉक्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय मिक्स बॉक्सिंग रेफ्री सेमिनार रोहा तालुका क्रीडा संकुल,धाटव , जिल्हा-रायगड या ठिकाणी आयोजित केले होते.

या सभेचे संपूर्ण नियोजन रायगड जिल्हा मिक्स बॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष विकास भोईर व सचिव मुकेश भगत तसेच जिल्हाप्रमुख अतिश साळवी , रोहा तालुका अध्यक्ष रोहन शेवाळे व महाराष्ट्र पंच प्रशिक्षक विनायक सकपाल यांनी उत्तम प्रकारे केले होते.

या सेमिनार ला तालुका क्रीडा अधिकारी श्री रवींद्र कानेकर सर, भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाचे संस्थापक महासचिव श्री.राकेश म्हसकर सर, सदस्य अश्विनी चौहान, प्रणाली पाटील व विनायक सकपाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य रेफ्री सेमिनार ॲमॅच्युअर मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रशांत मोहिते सर व महासचिव नारायण कराळे
महाराष्ट्र त्रांतिक संचालक श्री.सागर शेलार सर, डेवलपमेंट इंचार्ज रवी बारापात्रे व महाराष्ट्र आयोजन समिति अध्यक्ष गणेश पेरे सर यांच्या देखरेखी खाली पार पडले. हे प्रशिक्षण अतिशय खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडले. मिक्स बॉक्सिंग खेळाचा प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त कसा प्रचार – प्रसार व विकास होईल यावर चर्चा झाली. या सेमिनारमध्ये महाराष्ट्रातून सुमारे १० ते १५ जिल्ह्यांनी सहभाग घेतला. त्यात सेमिनारमध्ये भाग घेतलेल्यांची नावे पुढील प्रमाणे…
१. पारस कांबळे -पुणे
२. सिद्धी पंकज क्षिरसागर-पुणे
३. प्रियंका शरद बोडके-पुणे
४. सुरज कदम -पुणे
५. विनोद प्रल्हाद दाढे-नांदेड
६. आर्यन कानोबा कांबळे- नांदेड
७. हितेश रामचंद्र भगत -अलिबाग
८. निर्मळ परेश पाटील-अलिबाग
९. वैदही हिराचंद पाटील-अलिबाग
१०. प्रिया उमेश तावडे-अलिबाग
११. भार्गवी रंजीत म्हात्रे-अलिबाग
१२. पवनता सुनील पवार- रायगड
१३. मनस्वी रमेश तांडेल – रायगड
१४. कीर्ती कृष्णा तांडेल-रायगड
१५. विकास भोईर- रायगड
१६. दीपक घरत-रायगड
१७. प्रगती भोईर – रायगड
१८. सुबोध शिंदे – रायगड
१९. उत्कर्ष घाणेकर -रायगड
२०. योगेश वरगुडे – रायगड
२१. भाग्यश्री मोरे – रायगड
२२. सुरज कुश्वा- रायगड
२३. वंदना कतोरे – बुलढाणा
२४. आनंद जाधव – नाशिक
२५. मयंक सक्सेना – नाशिक
२६. मंगेश इटखडे – बुलढाणा

या सर्व सहभाग घेतलेल्यांना भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षा ना. आदिती ताई तटकरे (मंत्री-महिला व बाल विकास मंडळ, महाराष्ट्र राज्य), ॲमॅच्युअर मिक्स बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष या.श्री. अनिकेत भाई तटकरे साहेब (आमदार) व महासंघाचे चेअरमन सुरज जी मगर साहेब, तालुका क्रीडा अधिकारी श्री रवींद्र कानेकर सर, भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाचे संस्थापक महासचिव श्री.राकेश म्हसकर सर, सदस्य अश्विनी चौहान, प्रणाली पाटील व विनायक सकपाल यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे