Breaking
ब्रेकिंग

आंबेडकर चवळीतील युवक कार्यकर्ते बच्चन भालेराव यांना मान्यवरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

हिवरगाव पावसा येथील धम्म संस्कार केंद्रात वाढदिवस उत्साहात साजरा

0 4 0 3 8 5

आंबेडकर चवळीतील युवक कार्यकर्ते बच्चन भालेराव यांना मान्यवरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

हिवरगाव पावसा येथील धम्म संस्कार केंद्रात वाढदिवस उत्साहात साजरा

संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव

हिवरगाव पावसा येथील सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे आंबेडकर चवळीतील युवक कार्यकर्ते बच्चन भालेराव यांना ३०व्या वाढदिवसा निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.धम्म कार्यात अग्रेसर असतात.महापुरुषांच्या जयंती उत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नेहमीच असतो.रिपब्लिकन युवा सेना तालुकाध्यक्ष बच्चन भालेराव यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा ताई रुपवते,रिपब्लिकन युवा सेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव,दलित पॅंथरचे शहराध्यक्ष राजू खरात,हिवरगाव पावसा ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष गडाख,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रामदास भालेराव,बौद्धाचार्य गौतम गौतम भालेराव,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,वृक्षमित्र गणपत पावसे,
कृषी साधनाचे संपादक यादवराव पावसे यांच्या सह राजकीय,सामाजिक,धार्मिक
क्षेत्रातील मान्यवरांकडून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या.

मागासवर्गीय बौद्ध समाजातील शेतकरी कुटुंबात बच्चन बाळू भालेराव यांचा जन्म ११ जून १९९५ रोजी झाला.गरिबीच्या परिस्थितीत बी.ए.पर्यंतचे शिक्षण संगमनेर कॉलेज संगमनेर येथे पूर्ण केले.त्यानंतर आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक व धम्म कार्यात सहभागी होऊ लागले.रिपब्लिकन युवा सेना
संगमनेर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पारपाडत आहे.हिवरगाव पावसा येथील धम्म संस्कार वर्गाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत आहे.

सतत उपक्रमातील सामाजिक बांधिलकी जपणारा युवक कार्यकर्त्यास समाजातील विविध क्षेत्रात मान्यवरांसह ग्रामस्थांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सायंकाळी हिवरगाव पावसा येथील धम्म संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी
संदिप मोकळ,शरद बागुल,बौद्धाचार्य बाळासाहेब भालेराव,आबाजी भालेराव , राहुल भालेराव,सतिश भालेराव, प्रल्हाद मोकळ,सर्पमित्र दगडू रुपवते,अंकुश कोळगे,प्रियंका कोळगे,अंजनाबाई भालेराव आणि बाल संस्कार केंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 3 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे