Breaking
ब्रेकिंग

घरफोडी, चोरीच्या तीन घटनेतील तब्बल साडेसहा लाखांचा ऐवज परत

मुद्देमाल परत मिळाल्याने मूळ मालकांनी व्यक्त केला आनंद

0 3 9 0 4 0

घरफोडी, चोरीच्या तीन घटनेतील तब्बल साडेसहा लाखांचा ऐवज परत

मुद्देमाल परत मिळाल्याने मूळ मालकांनी व्यक्त केला आनंद

प्रतिनिधी :- पंकज पाटील

चांदवड : घरफोडी व चोरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये चांदवड पोलिसांनी हस्तगत  केलेले सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ६ लाख ५६ हजारांचा ऐवज बुधवारी (दि. ८) उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या हस्ते मूळ मालकांकडे सुपुर्द करण्यात आला.निमोण येथील निवृत्ती पांडुरंग उगले यांच्या घरात दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी भरदिवसा घरफोडी करुन ५ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांनी शिताफीने तपास करत आठ दिवसांत चोरट्यास अटक केली होती व गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला होता. सदर ऐवज पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर निवृत्ती उगले यांच्याकडे सुपूर्द केला. सन २०२१ मध्ये चांदवड येथील संजय गवळी यांच्या घरात पाडव्याच्या दिवशी चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्यात चोरट्यास अटक करत त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला होता. यातील ऐवज फिर्यादी संजय गवळी यांच्याकडे सुपुर्द केला. दि.२८ ऑक्टोबर २०२४ रोजी येथील कृषी कार्यालयाजवळून अज्ञात चोरट्याने स्वाती आहेर (रा. चांदवड) यांच्या मालकीची दुचाकी (क्र. एमएच २० सीजे ९११७) लंपास केली होती. याबाबत पोलिसांनी तपासचक्रे फिरवून चोरट्याकडून सदर दुचाकी हस्तगत केली होती. या तीनही गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानंतर मूळ मालकांच्या स्वाधीन केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे