Breaking
ब्रेकिंग

प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून वाढदिवस साजरा करावा प्रमोद मोरे

0 3 9 0 4 8

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा महाराष्ट्रभर उपक्रम

प्रतिनिधी : जावेद शेख

प्रत्येकाच्या जीवनात वाढदिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो आपला वाढदिवस आठवणीत राहण्यासाठी खूप पैसा देखील खर्च होतो परंतु आपला वाढदिवस हा पर्यावरणासाठी भावी पिढीसाठी उपयोगी पडावा आपली प्रत्येक वाढदिवसाच्या आठवण राहावी यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून वाढदिवस साजरा करावा ही सुरुवात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केली. तसेच वाढदिवस समारंभ, लग्न समारंभ,तसेच विविध समारंभात आपण पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ न देता व लग्नात सत्कार न करता सत्कार हा झाड देऊनच करावा असे आवाहन प्रमोद मोरे यांनी केले निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर चालते विविधजिल्ह्यात, तालुक्यात तालुक्यात सदस्य कार्यरत आहे व पर्यावरण संरक्षणासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे या मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात यावेळी वाढदिवसानिमित्त सर्व सदस्य झाड लावून आपला वाढदिवस साजरा करणार आहे तसेच प्रमोद मोरे यांनी देखील झाड लावून वाढदिवस साजरा केला यावेळी रविंद्र पवार, संजय नेटके, देविदास खेडकर, संजय गायकवाड, अमोल जाधव,महेश पाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे