Breaking
ब्रेकिंग

श्रीरामपूर मतदारसंघात विखेंना खिंडार

0 3 9 0 3 9

 

विखे समर्थक गणेश भांड यांचा काँग्रेसला पाठिंबा

लवकरच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश!

प्रतिनिधी :  जावेद शेख

विखे समर्थक म्हणून राहुरी आणि श्रीरामपूर मतदारसंघात परिचित असलेले चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून गणेश भांड लवकरच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहे.

राहुरी फॅक्टरी येथे गणेश भांड यांनी पत्रकार परिषद घेऊन हेमंत ओगले यांना पाठींबा दिला आहे. यावेळी हेमंत ओगले, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य , बाबासाहेब दिघे उपस्थित होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे निकटवर्तीय असलेले भांड यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने विखे गटाला खिंडार पडले आहे.

यावेळी रावसाहेब शिंदे,अनवर शेख,चांगदेव फटांगरे,ताराचंद जाधव आदींनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी बाळासाहेब भांड ,विकास आघाडीचे सचिव संपत जाधव दीपक त्रिभुवन, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे,आदर्श पतसंस्थेचे व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज,काँग्रेसचे श्रीरामपूरचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखरे, वैभव गिरमे, दीपक पठारे, रितेश रोटे,नानासाहेब कदम, कुणाल पाटील, विठ्ठल चव्हाण, भगवान गडाख, कारभारी वाळुंज आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे