Breaking
ब्रेकिंग

अमळनेर येथे ‘समावेशित शिक्षण’ विषयावर दोन दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण संपन्न

लोकमान्य विद्यालयात मुख्याध्यापक, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0 7 6 9 4 3

अमळनेर येथे ‘समावेशित शिक्षण’ विषयावर दोन दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण संपन्न

लोकमान्य विद्यालयात मुख्याध्यापक, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :-समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक यांचे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण नुकतेच लोकमान्य विद्यालय, अमळनेर येथे उत्साहात संपन्न झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करावयाचे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर या कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील साहेब होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्ताराधिकारी श्री. रावसाहेब पाटील आणि तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती शितल भदाणे यांनी केले. त्यांनी प्रशिक्षणाचा उद्देश आणि दोन दिवसांच्या रूपरेषेबाबत माहिती दिली.प्रशिक्षणादरम्यान विविध सत्रांमध्ये तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले:प्रशस्त (PRASHAST) ॲप: दिव्यांग मुलांच्या स्क्रीनिंगसाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘प्रशस्त ॲप’ची तांत्रिक माहिती आणि त्याचा प्रभावी वापर श्री. पंकज काटे यांनी करून दाखवला.*
दिव्यांगत्वाचे २१ प्रकार: श्री. मोहन मराठे यांनी शासन निर्णयानुसार दिव्यांगत्वाच्या २१ प्रकारांची सविस्तर माहिती देऊन त्यांची लक्षणे कशी ओळखावीत, याबाबत मार्गदर्शन केले.दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक व सहाय्यभूत साहित्य साधना बाबत माहिती श्रीमती. शितल भदाणे यांनी मार्गदर्शन केले.
शालेय अभिलेख व शासन निर्णय: श्री. किशोर पाटील यांनी शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत कोणते रेकॉर्ड ठेवावेत आणि शासनाचे या संदर्भातील विविध निर्णय (GR) यावर प्रकाश टाकला.UDID कार्ड प्रक्रिया: दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेले ‘युडीआयडी’ (UDID) कार्ड काढण्याची प्रक्रिया आणि त्याचे फायदे श्री. प्रशांत पाटील यांनी समजावून सांगितले.हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी श्रीमती रेखा वारडे, श्रीमती सीमा पाटील, श्रीमती सुनिता पाटील, श्रीमती मोनाली पाटील, श्री. हंसराज पाटील, श्री. पवन शिंदे, श्री. अमोल पाटील आणि श्री. पंकज महाजन यांनी उपस्थिती नोंदणीपासून ते संपूर्ण नियोजनापर्यंत विशेष परिश्रम घेतले.या प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल, असा विश्वास सहभागी शिक्षकांनी व्यक्त केला. तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या उपस्थितीने हा उपक्रम यशस्वी झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे