Breaking
ब्रेकिंग

सामाजिक आरोग्य विषयक उपक्रम घेवून नागरिकांना मदत करणार – भरत कांगुडे

नारायणडोहो येथे रक्तदान शिबिर संपन्न

0 3 9 0 3 0

नारायणडोहो येथे रक्तदान शिबिर संपन्न

सामाजिक आरोग्य विषयक उपक्रम घेवून नागरिकांना मदत करणार – भरत कांगुडे

ब्युरो रिपोर्ट /  एस डब्ल्यु न्यूज

नारायणडोहो : शिवतीर्थ सामाजिक संघटना, नमो बहुउद्देशीय संस्था आणि अष्टविनायक ब्लड बँक ,नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि . ८ डिसेंबर २०२४ रोजी नारायणडोहो येथील श्री चांगदेव महाराज मंदिर येथे रक्तदान शिबिर राबविण्यात आले . या शिबिरासाठी सामाजिक कार्यकर्ते भरत कांगुडे , पत्रकार रफिक शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव ,नमो संस्थेच्या सचिव पुनम कानडे यांचे विशेष सहकार्य लाभले . शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला .

यावेळी भरत कांगुडे यांनी सांगितले की, रक्ताचा खुप तुटवडा असुन रक्त संकलन होणे खुप गरजेचे आहे . जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे . सामाजिक आरोग्य विषयक उपक्रम घेवून नागरिकांना मदत करणार असून संस्थे मार्फत विविध शासकिय योजनांची माहिती नागरिकां पर्यंत पोहचविणार आहे .गोरगरिबांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्यास संस्था प्रयत्नशील राहणार आहे .

सामाजिक कार्यकर्ते व ब.स.प चे शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी सांगितले की, रक्तदान शिबिरासाठी विविध ठिकाणी संपर्क करून रक्तदान शिबिरे घेण्यासाठी सहकार्य करू आणि रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांना प्रोत्साहीत करू .

या शिबिरासाठी शिवतिर्थ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष भरत कांगुडे , उपसरपंच अनिल कराळे, विकास बेद्रे, दीपक पवार, स्वप्निल ठाकूर, ऋषिकेश डमाळे, वैभव जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले .

यावेळी चैतन्य साठे ,अशोक गुंड, अभिषेक साठे, विकास बेद्रे, किरण गांगर्डे ,गणेश कांगुडे , गणेश फुंदे ,शुभम साठे, प्रभात साठे, संकेत साठे ,सचिन चव्हाण, किरण साठे, ज्ञानेश्वर साठे, आबासाहेब साठे, चांगदेव साठे, नितिन शिर्के आदि युवक व नागरिक उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे