श्री नागेश्वर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
श्री नागेश्वर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
प्रतिनिधी :- पंकज पाटील
निमोणे :- निमोणे येथील नेहरू शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालयात दिनांक 1/2/2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री विठ्ठल शितोळे मा अध्यक्ष शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ व सचिव श्री मारुती कशिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत शरद काळे, सरपंच सुषमा काळे, जे आर काळे, माजी सरपंच संजू आबा काळे, ग्रामपंचायत सदस्य शामकांत ढोरजकर, आप्पाराव काळे, एम टी काळे सर, अमोल थोरात, प्रवीण दोरगे, नवनाथ गव्हाणे, राहुल भोसले, मयूर ओस्तवाल, शिवराज काळे, पप्पू पाटील काळे, राजू पवार, पायल कोंडे मॅडम, शितल काळे, नीता गुंड, सुनिता शिंदे, हे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते, तसेच पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयातील मुलांना यशवंत गुणवंत घडवणाऱ्या संस्थेत गुणगौरव सोहळा पार पडला सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मुख्याध्यापक श्री राजाराम ढवळे सर यांच्या प्रास्तविकेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली श्री नागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रम सादर केले यात पारंपारिक नृत्य विनोदी चुटकुले देशभक्तीपर गीते ऐतिहासिक पोवाडे सादर केले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे प्रदर्शन या संमेलनातून दिसून आले या स्नेहसंमेलनासाठी निमोणे व परिसरातील नागरिकांनी कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती संस्था अध्यक्ष सचिव पदाधिकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले सांस्कृतिक कार्यक्रम श्री सरोदे सर, सौ नरुटे मॅडम, श्री वाघ सर, श्री तिवारी सर, यांनी हा कार्यक्रम बसविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली होती यावेळी विद्यालयातील शिक्षक श्री दुर्गे सर, श्री पाटील सर, श्री शिरगिरे सर, श्री चौधरी सर, श्री चव्हाण, हे सर्व शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच शाळेचे चालू असलेल्या बांधकामासाठी ग्रामस्थांनी देणगी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सरवदे सर, यांनी केले सर्वात शेवटी आभार सौ नरूटे मॅडम यांनी मानले शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत काळे यांनी वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमा दिवशी सर्व विद्यार्थ्यांना जेवण दिले.


