Breaking
ब्रेकिंग

रुईछत्तीशी स्मशानभूमीसाठी २५ लाख निधी मंजूर ; मा. उपसभापती रविंद्र भापकर यांचा पुढाकार…

0 8 6 6 8 1

रुईछत्तीशी स्मशानभूमीसाठी २५ लाख निधी मंजूर ; मा. उपसभापती रविंद्र भापकर यांचा पुढाकार…

नगर /  प्रतिनिधी : शिवा म्हस्के

नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथील स्मशानभूमीसाठी अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न होता तसेच जागे संबंधित गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा जागेवरून मतभेद होते त्यांमुळे या विषयी गोंधळ परिस्थिती निर्माण होत होती.शेवटी रुईछत्तीसी ग्रामस्थांनी या विषयावर ग्रामसभेत ठोस भुमिका मांडल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी सदर विषयी भुमिका मवाळ केल्याने या जागा विषयांचा तोडगा निघाला या स्मशानभूमी विषयी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून १५ लाख तर आमदार विक्रम पाचपुते यांच्या निधीतून १० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.

नगर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र भापकर यांनी पत्राद्वारे ही मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या कडे केली होती. रविंद्र भापकर यांच्या पत्राचा विचार करून सुजय विखे यांनी रुईछत्तीसी ग्रामस्थांनी जिव्हाळ्याचा प्रश्न गांभीर्याने विचार करून सदर कामासाठी निधी मंजूर केला. रुईछत्तीसी गावातील स्मशानभूमी भव्य दिव्य अशी साकारणार आहे.गावातील स्मशानभूमीसाठी काही लोकवर्गणीतून देखील निधी जमा करण्यात येणार आहे. शुढळा नदी तीरावर स्मशानभूमी चे काम अजून प्रगतीपथावर येईल असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विक्रम पाचपुते यांचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक आभार मानले आहे..

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे