Breaking
ब्रेकिंग

आडसूळ शैक्षणिक संकुल उच्च शिक्षणाचा दीपस्तंभ . . .

0 3 9 0 2 9

आडसूळ शैक्षणिक संकुल उच्च शिक्षणाचा दीपस्तंभ . . .

एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा

पद‌वी आणि पद‌व्यूत्तर पद‌वीच्या उच्च शिक्षणासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आकर्षनाचा केंद्रबिंदू ठरलेले आडसूळ शैक्षणिक संकुल हे खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाचा दीपस्तंभअसल्याचे प्रतिपादन सहसंपाद‌क (दै. सकाळ) श्री. प्रकाश पाटील यांनी वार्षिक स्नेह‌संमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभात केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकेश्वर ग्रामिण विकास सेवा संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा. अनिरुद्ध माणिक आडसूळ हे होते, त्यांच्या समवेत प्राचार्य डॉ. पी. एम. पाटील व डॉ. संभाजी पठारे हेही उपस्थित होते. १७ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अनेकविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शेकडो विद्यार्थी- विद्यार्थीनींनी आपला सक्रिय सहभाग नोंदवून स्नेह संमेलनाचा आनंद द्विगुणीत केला. शिवजयंतीचे औचित्य साधून शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धां व राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजूषा स्पर्धांनी “सिनर्जी 2K25″ च्या उत्साहात जोश निर्माण केला. कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक कलाप्रकारांमुळे स्नेह संमेलनाच्या इंद्रधनुष्याचे रंग अधिक गडद होत गेले. यामध्ये कबड्‌डी – क्रिकेटसह, खो-खो,, बास्केटबॉल, हॉलीबॉल, या मैदानी खेळांसोबतच कॅरम, बुद्धीबळ याही क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी चांगला प्रतिसाद नोंदविला. ‘छावा’ सिनेमा मुळे समाजमनात संचारलेला उत्साह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रांगोळी आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेतून प्रकट झाला हीदेखील बाब उल्लेखनीय ठरली. शिवचरित्र प्रश्नमंजूषा स्पर्धेत देशातील विविध राज्यातून सुमारे १४८९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. दररोज गणवेशात येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी जेव्हा मिसमॅच डे, ट्विन्स डे, बॉलीवूड डे, साऊथ इंडियन डे च्या निमित्ताने विविधरंगी पोशाख परिधान करून येत तेव्हा खऱ्या अर्थाने विविधतेतील एकतेचे प्रदर्शन आपोआप घडत असे. संमेलनाचा अखेरचा दिवस हा तर सर्वांचाच विशेष आकर्षणाचा ठरला. स्पर्धेतील यशस्वी गुणवंत स्पर्धकांनी स्पर्धेत बाजी मारून प्रमुख पाहुणे श्री प्रकाशजी पाटील यांचे शुभहस्ते पारितोषिके पटकावली, तर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशस्वितेला मनापासून दाद दिली.
आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने सातत्याने क्रियाशील राहीले पाहिजे असा मोलचा सल्ला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध आडसूळ यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून दिला. “आडसूळ शैक्षणिक संकुल” उच्च शिक्षणाचा दीपस्तंभ करण्यासाठी प्रा. अनिरुद्ध आडसूळ यांनी घेतलेले परिश्रम त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला संघर्ष याबाबतच्या ठळक घटना घडामोडींचे विवेचन अहवालरूपाने आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य तथा संचालक डॉ. पी.एम. पाटील यांनी केले. दोन दशकांच्या संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीत एक तपाहून अधिक काळ अहोरात्र मेहनत घेणारे संस्थेचे दिवंगत उपाध्यक्ष स्व. विश्वनाथभाऊ आडसूळ यांना सऱ्हदय आदरांजली वाहतांना संपूर्ण सभागृह सद्गदित झाले. सर्वांच्या डोळयांच्या कडा पाणवल्या आणि प्रत्येकजण ‘नि:शब्द’ झालेला. भाऊंच्या जाण्याने संस्थेची प्रचंडे हानी झाली हीच भावना यातून व्यक्त होत होती.

चेअरमन प्रा. श्री अनिरुद्ध आडसूळ यांनी भाऊंच्या संस्मरणीय कार्याप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष पुरस्कार यावेळी जाहीर केले संकुलातील महाविद्यालयांमधून प्रथम वर्षात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यास व विषयात पैकीच्या पैकी गुणसंपादन करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी रुपये ५००१ आणि अंतिम वर्षात सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास रुपये १०,००१ रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह पारितोषिकाच्या स्वरूपात देण्यात येईल तसेच गुणवत्तापूर्ण शोध कार्य करणाऱ्या विद्यार्थी/ विद्यार्थिनी व शिक्षक यांना संशोधन अनुदान संस्थेद्वारे अदा करण्यात येईल असेही प्रा. श्री अनिरुद्ध आडसूळ यांनी सांगितले.

प्रमुख अतिथिंचे भाषण ही विद्यार्थ्यांना जशी बौद्धिक मेजवानी ठरली तशीच सुरुची भोजनाचीही मेजवानी व्यवस्थापनाने सर्व स्टाफ, पाहुणे, विद्यार्थी व सेवकांना उपलब्ध करुन दिल्याने स्नेह संमेलनाचा गोडवा अधिकच वाढला, नव्हे- नव्हे स्नेहसंमेलन संपूच नये अशीच विद्यार्थीमनाची संकल्पना उघड जाणवत होती. प्रमुख पाहुण्यांसमवेत उपस्थित मान्यवरांनी देखील संस्थेच्या दोन दशकांच्या प्रगतीचा लेखाजोखा जाणून घेतला, अभियांत्रिकी पदवीका व पदवी आणि एमबीए पदवीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुणवत्तेच्या बाबतीत पहिल्या काही मोजक्या महाविद्यालयांमध्ये गणल्या जाणाऱ्या आडसूळ टेक्निकल कॅम्पस बरोबरच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विधी महाविद्यालय, फार्मसी पदवी आणि पदविका महाविद्यालये आणि आडसूळ कॉम्प्युटर आणि मॅनेजमेंट इंस्टीट्यूट च्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व प्रकारचे उच्च शिक्षण गरजू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा आडसूळ परिवाराचा संकल्प सिद्धीस जाताना बघायला मिळत आहे. लवकरच सध्याच्या आठ महाविद्यालयांमध्ये आणखी एका महाविद्यालयाचा समावेश होणार असल्याचे सांगतांना संस्थेचे संस्थालक श्री. कृष्णा आडसूळ यांनी आडसूळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे सूतोवाच केल्याने सर्वांच्या माना अभिमानाने उंचावल्या. हजारो नवीन विद्यार्थी विद्यार्थीनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून तालुक्यांतून या दीपस्तंभाकडे अपेक्षेने पाहत असतात, त्यांची निवासाची देखील उत्कृष्ठ सोय आडसूळ शैक्षणिक संकुलात व्हावी, विद्यार्थ्यांना निकोप व सुरक्षित शैक्षणिक वातावरण लाभावे या उद्देशाने सुमारे १००० मुलामुलींची राहण्याची सोय वसतिगृहाच्या माध्यमातून लवकरच होणार असल्याचे तसेच २५०-३०० शिक्षक – शिक्षकेतर सेवकांची निवास व्यवस्था होणार आहे, असे संस्थेच्या सेक्रेटरी सौ. लीनाताई आडसूळ यांनी सांगितले.

आडसूळ शैक्षणिक संकुलात अद्यावत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे खजिनदार श्री. परमेश्वर आडसूळ हे अविरत धडपड करतांना जसे दररोज दिसतात तशीच स्नेहसंमेलनात त्यांची लगबग दिसत होती. शैक्षणिक दर्जा टिकविण्यासाठी तंत्रशिक्षणाचा ३६ वर्ष अनुभव असलेले डॉ. पी. एम. पाटील व उच्च शिक्षणाचा ४० वर्षांचा अनुभव असलेले डॉ. संभाजी पठारे यांची संकुलाच्या प्राचार्य तथा संचालकपदी केलेली निवड ही गुणवत्तेचीच हमी होय. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य. रमेश गडाख , डॉ. वायाळ, डॉ. लांडगे, डॉ. प्रदीप पंडित, प्रा. रियाज बेग, डॉ. जी. पी. गिरवले हे आपापले काम उत्कृष्टपणे सांभाळत आहेत. या सर्वांच्या सांघीक प्रयत्नांतून व संकुलात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवकांच्या अथक परिश्रमातून हे संमेलन यशस्वी होण्यात मदत तर झालीच तथापी आडसूळ परिवारातील श्रद्धास्थानी असलेले श्री. माणिकराव आडसूळ, सौ. सुंदरबाई आडसूळ तसेच मा. कल्पना आडसूळ आणि सौ. रत्ना आडसूळ यांच्या उपस्थितीने संमेलनाला कौटुंबिक ओलावा लाभला.

1/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे