चित्रलेखा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ; राज्य सोशल मिडीया आघाडीच्या अध्यक्षा तसेच शेकाप प्रवक्त्यापदी निवड

चित्रलेखा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ;
राज्य सोशल मिडीया आघाडीच्या अध्यक्षा तसेच शेकाप प्रवक्त्यापदी निवड
| अलिबाग | प्रतिनिधी |राजेश बाष्टे
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची शेकाप महाराष्ट्र राज्य सोशल मिडीया आघाडीच्या अध्यक्षा तसेच शेकाप प्रवक्त्या म्हणून निवड करण्यात आली आहे. शेकापच्या मेळाव्यात ही निवड जाहीर करण्यात आली असून नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे.
चित्रलेखा पाटील या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. मुली शिकल्या पाहिजे हा ध्यास घेत त्यांनी सामाजिक बांधिलकीतून तसेच त्यांच्या प्रयत्नातून हजारो मुलींना सायकली दिल्या आहेत. शिक्षण घेऊन नोकरी नसलेल्या तरुण तरुणींसाठी रोजगार मेळावा आयोजित करून रोजगाराचे दालन खुले करून दिले आहे. विचारांची देवाण घेवाण व्हावी, यासाठी खास महिलांसाठी कृषीवल हळदी कुंकू सारखे उपक्रम राबविले आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. महिलांसह अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या नेत्या असून जनमानसात मिळणाऱ्या ताई म्हणून त्यांनी अगदी कमी कालावधीत ओळख केली. शेकाप महाराष्ट्र राज्य सोशल मिडीया आघाडीच्या अध्यक्षा तसेच शेकाप प्रवक्त्या म्हणून चित्रलेखा पाटील यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. शिक्षण आणि राजकीय, सामाजिक, क्रिडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवाचा पक्षाच्या वाढीसाठी फायदा होणार आहे.