तरुणांनी मनसे सदस्य नोंदणीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे :-सरचिटणीस गजानन राणे
गजानन राणे यांची धानोऱ्या येथे विविध कार्यक्रमास भेट देऊन चर्चा
गजानन राणे यांची धानोऱ्या येथे विविध कार्यक्रमास भेट देऊन चर्चा
तरुणांनी मनसे सदस्य नोंदणीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे :-सरचिटणीस गजानन राणे
जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील
जळगाव : धानोरा ता. चोपडा येथे ९ ते १४ एप्रिल दरम्यान होणाऱ्या चतुर्विध महोत्सव महाविष्णू यज्ञ याग सोहळ्यास मनसेचे जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष व कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे यांनी रावेर लोकसभा दौरा करत असताना, धानोऱ्यात होणाऱ्या महाविष्णू यज्ञ याग कार्यक्रमास भेट देऊन मंदिर विश्वत मंडळाशी चर्चा केली. कार्यक्रमाची आयोजन समितीकडून निमंत्रण पत्रिका देण्यात आली. या दौऱ्यादरम्यान धानोरा गावातील तरुणांना मनसे सदस्य नोंदणीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, असे सांगितले. तसेच मनसेची ही सदस्य नोंदणी मोहीम महत्त्वाची आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, किरण तळेले, कल्पेश खैरनार, ग्रा.पं. सदस्य लीला विशाल महाजन, विशाल महाजन, विष्णू कोळी, चैतन्य महाजन, महेंद्र पाटील व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.



