Breaking
ब्रेकिंग

विधी शिक्षणाकडे पाहण्याचा पारंपारीक दृष्टीकोन आता बदलला असुन प्रत्येक क्षेञात संधी : महेश जोशी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर

0 8 9 6 7 5

विधी शिक्षणाकडे पाहण्याचा पारंपारीक दृष्टीकोन आता बदलला असुन प्रत्येक क्षेञात संधी :
महेश जोशी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर

अहिल्यानगर / प्रतिनिधी

अहिल्यानगर : “पुर्वीच्याकाळी विधीशिक्षण घेऊन केवळ न्यायालयात वकील किंवा न्यायाधीश होता येत असे परंतु आता जागतिकीकरणामुळे जग आणि देश जवळ आले असून या क्षेत्रात अनेकानेक संधी निर्माण झाल्या आहेत”, असे प्रतिपादन महेश जोशी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर यांनी केले. येथील न्यू लॉ कॉलेजच्या पाच वर्षीय व तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या नवीन प्रवेशीत विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील होते यावेळी व्यासपीठावर महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.मोरे ए.एल., प्रा.डॉ . रामेश्वर दुसुंगे उपस्थित होते.

या वेळी बोलताना महेश जोशी म्हणाले की, आजच्या युगात विधीज्ञाची गरज प्रत्येक क्षेञात निर्माण झाली असुन कायदयाचा सखोल अभ्यास असणे महत्वाचे आहे अध्यक्षपदावरुन अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील म्हणाले की, “संस्थेच्या उभारणीत राजषी शाहु महाराजांचा मोठा वाटा असुन गामीण भागातील आणि गरजु विदयार्थ्यांना संस्था सर्वतोपरी सहकार्य करीत असते वकिली व्यवसाय हा समाजभिमुख करुन या व्यवसायात चांगली मूल्ये आणि तत्वे बाळगताना एक सृजनशील आणि संवेदनशील नागरीक बनणे गरजेचे आहे. प्राचार्य डॉ. मोरे. ए .एल. यांनी प्रास्तावीक करताना महाविदयालयाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज संस्थेच्या मार्गदर्शनखाली महाविदयालयाची उतरोत्तर प्रगती होत असल्याचे सांगितले .

प्रथम वर्षाचे अवस्थी, शर्मा, लोढा, वेदांत विधाते यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांची ओळख प्रा. प्रियंका खुळे यांनी करून दिली. आभार प्रा. डॉ . रामेश्वर दुसुंगे यांनी मानले. तर सुत्र संचालन संपदा लांडगे हिने केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

यावेळी दुस-या सत्रामध्ये प्रा. डॉ. बी.डी. पांढरे यांचे ‘विधी क्षेत्रातील संधी’ या विषयावर तसेच प्रा. डॉ. सुहास तोरडमल यांचे शैक्षणिक उपक्रम आणि परीक्षा पध्दती या विषयावर व्याख्यान झाले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे