Breaking
ब्रेकिंग

नगर – पाथर्डी रोडवर भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार, महिला जखमी, कौडगाव शिवारातील घटना

0 3 9 0 4 8

नगर – पाथर्डी रोडवर भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार, महिला जखमी, कौडगाव शिवारातील घटना

विशेष प्रतिनिधी : रफिक शेख

नारायणडोह (प्रतिनिधी) – नगर पाथर्डी रोड वर भरधाव वेगातील कारने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवर पाठीमागे बसलेली वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात १९ मार्चला सकाळी ८.३० च्या सुमारस हा अपघात झाला आहे.

या अपघातात अशोक मारुती देशमुख (वय ५३, रा, एकता कॉलनी, केडगाव) हे मयत झाले तर आसराबाई साहेबराव ठुबे (वय ७०, रा. मुंगी, ता.नगर) या जखमी झाल्या आहेत. याबाबत मयत अशोक देशमुख यांचा मुलगा विशाल अशोक देशमुख (वय २४, रा, एकता कॉलनी, केडगाव) याने नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून किया कंपनीच्या कारचा चालक गोटीराम लक्ष्मण गारडे (रा. कात्रज, पुणे) याच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत व जखमी हे दुचाकीवर नगरहून पाथर्डीच्या दिशेने जात असताना कौडगाव शिवारात गजानन हॉटेल समोर पाथर्डी कडून भरधाव वेगात नगर कडे येणाऱ्या किया कंपनीच्या कारने (क्र.एमएच १२ टीयु ९५४९) त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या धडकेत अशोक देशमुख हे जागीच ठार झाले तर आसराबाई ठुबे या जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त कार ताब्यात घेतली. त्यानंतर दुपारी विशाल देशमुख याच्या फिर्यादी वरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे