Breaking
ब्रेकिंग

२२४ पारनेर मतमोजणी केंद्राबाहेरील पारनेर ते अळकुटी पर्यंतच्या वाहतुक मार्गात बदल

0 3 9 0 4 0

२२४ पारनेर मतमोजणी केंद्राबाहेरील पारनेर ते अळकुटी पर्यंतच्या वाहतुक मार्गात बदल

 

जिल्हा प्रतिनिधी :  महेश चव्हाण

पारनेर :   दि. २३/११/२०२४ रोजी २२४ पारनेर विधानसभा मतदार संघातील मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, पारनेर येथे होणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर विधानसभेचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीकांची व वाहनांची गर्दी होण्याची शक्याता असुन गर्दीच्या कालावधीमध्ये वाहतुकीमुळे नागरीकांची गैरसोय होयु नये. तसेच वाहनांचा धक्का लागुन अपघात होवुन नागरीकांच्या सुरक्षिततेस धोका पोहोचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. या करीता शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, पारनेर २२४ पारनेर मतमोजणी केंद्राबाहेरील पारनेर ते अळकुटी पर्यतच्या वाहतुक मार्गात बदल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. दि.२३/११/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते २०:०० वा.पर्यंत खाजगी, प्रवासी व इतर वाहनांच्या मार्गात खालोल प्रमाणे बदल करण्याचे नियोजित आहे.
१) पारनेर कडुन अळकुटी कडे जाणारी खाजगी, प्रवासी व इतर मोठ्या वाहनांकरीता वाहतुकीचा ➡️मार्ग – > पारनेर- मिलन चौक- कान्हुर पठार रोड गणपती फाटा पुणेवाडी अळकुटी.➡️

२) अळकुटी कड्डुन पारनेर कडे येणारे प्रवासी व इतर मोठ्या वाहनांकरीता वाहतुकीचा ➡️मार्ग > अळकुटी पुणेवाडी गणपती फाटा कान्दुर पठार रोड मिलन चौक पारनेर.➡️

३) पारनेर कडुन निघोज कडे जाणारी खाजगी, प्रवासी व इतर मोठया वाहनांकरीता वाहतुकीचा ➡️मार्ग > पारनेर मिलन चौक सिद्धेश्वरवाडी रोड गांजी भोयरे जवळा – निघोज➡️

उपरोक्त आदेशचे पालन करुन नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्या करणे बाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवाहन केले आहे.

प्रस्तुत आदेश सदर मतमोजणी करीता येणारी वाहने, अॅम्ब्युलन्स, अग्नीशामक दल, शासकीय वाहने व स्थानिक प्रशासनाकडुन अत्यावश्यक कारणास्तव प्रवेश देण्यात येणारे वाहनांना लागु राहणार नाही अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे