ब्रेकिंग
संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालयाचे श्रीकांत सावंत सर जिल्हास्तरीय कृतिशील क्रीडा शिक्षक म्हणून सन्मानित
0
3
9
0
3
2
संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालयाचे श्रीकांत सावंत सर जिल्हास्तरीय कृतिशील क्रीडा शिक्षक म्हणून सन्मानित
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १५/ संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथील श्रीकांत सावंत सर यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्हास्तरीय कृतिशील क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याबद्दल मा. आमदार संजय मामा शिंदे, संस्थापक नंदकुमार टोणपे, सचिव रोहन टोणपे, सदस्य डॉ. रोहित टोणपे, मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
0
3
9
0
3
2