Breaking
ब्रेकिंग

शालेय स्तरीय कराटे स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा चे घवघवीत यश; विजयी खेळाडूंची पुणे विभागीय शालेय स्तरीय स्पर्धेसाठी निवड

0 8 9 6 7 5

शालेय स्तरीय कराटे स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा चे घवघवीत यश; विजयी खेळाडूंची पुणे विभागीय शालेय स्तरीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १३/ महाराष्ट्र शासन क्रीडा युवक व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद याच्या सयुक्त विद्यमाने आयोजित करमाळा तालुका शालेय स्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सर्व वयोगटातील मुला मुलींनी सहभाग नोंदवला होता. तसेच करमाळा तालुक्यातील विविध शाळेतील खेळाडूनी सहभाग नोंदवला होता. 

या स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे विद्यार्थी कराटे स्पर्धेत तालुक्यात व जिल्ह्यात प्रथम आले आहेत. विजय खेळाडूंची पुणे विभागीय शालेय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक नागनाथ बोडके सर, करमाळा तालुका क्रीडा संयोजक राम काळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे विश्वस्त मा. श्री. संभाजी किर्दक, श्री. नागनाथ बोळगे सर, गुरुकुल स्कूल क्रीडा शिक्षक झिजांडे, अभिषेक सर, करमाळा तालुका क्रीडा संयोजक राम काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

सर्वांनी विजयी खेळाडूंना पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात दिल्या.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे