तालुक्यातील विद्यार्थ्यांचा धोका पत्करुन प्रवास : बससेवा वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष*
बससेवा कोलमडल्याने प्रवासी-विद्यार्थ्यांचे हाल.*
बससेवा कोलमडल्याने प्रवासी-विद्यार्थ्यांचे हाल.
तालुक्यातील विद्यार्थ्याचा धोका पत्करुन प्रवास : बससेवा वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
पूर्वीप्रमाणे बस सुरु ठेवा विद्यार्थी वर्गातून होते मागणी.
नारायणडोहो : अहिल्या नगर तालुक्यातील ग्रामीण भागातील नारायणडोहो, उक्कडगाव, मांडवे, लोणी सय्यदमीर, पिंपळा,गुणवडी ,हातवळण, अशा विविध मार्गावरील बससेवा वेळापत्रक कोलमडल्याने आहे .नागरिकांना व विद्यार्थ्यांना सुव्यवस्थ स्थितील उपलब्ध नाही विद्यार्थी , कामगार, यांना धोका पत्करुन शिक्षणासाठी, कामांसाठी प्रवास करावा लागत आहे. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी आणि पालकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अहिल्या नगर शहरात हायटेक बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हे बसस्थानक आणि आगार फक्त शोभेची वास्तू बनुन राहिला नको. बस आगारात एकही नवीन बस नजरेस पडत नाही. तसेच आगाराला आवश्यक असणाऱ्या बस उपलब्ध नसल्याने संपूर्ण ग्रामीण भागातील बससेवा कोलमडली आहे. एकाही गावात सुरळीत बससेवा नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी अहिल्या नगर आणि नारायणडोहो, उक्कडगाव, मांडवे, लोणी सय्यदमीर, पिंपळा
रोज येतात. अहिल्या नगर येथील शाळा, महाविद्यालयही सकाळच्या सत्रात सुरू होतात.
यासाठी विद्यार्थी, कामगार , रुग्ण पहाटे सहापासूनच अहिल्यानगरला येण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र ग्रामीण भागातून अहिल्या नगरला येण्यासाठी सकाळी ६ ते १०.३० पर्यंत सुरळीत बससेवा नसल्याने विद्यार्थ्या, कामगार , रुग्ण ताटकळत उभे रहावे लागते. तसेच बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना अक्षरश: लोंबकळत धोका पत्करुन प्रवास करावा लागत आहे. अहिल्या नगर तालुक्यारच्या नारायणडोहो, उक्कडगाव, मांडवे, लोणी सय्यदमीर, पिंपळा भागातून सकाळच्या वेळेत विद्यार्थी शाळा, महाविद्यालयासाठी अहिल्या नगरला येतात. मात्र सकाळच्या वेळेत बससेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सोमवार पासून पेपर सुरु होणार आहे. वेळेवर बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
हीच बस जर सकाळी ८.३० वा ९:०० व १०:३० व संद्याकाळी ४:००, ५.३० ची बस सोडल्यास विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.पूर्वीप्रमाणे बस सुरु ठेवावा अशी मागणी विद्यार्थी मधून होत आहे.आगार व्यवस्थापकांनी प्रत्यक्षात महाविद्यालय शाळा, हायस्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्या भागातुन ये-जा करणारे विद्यार्थी महाविद्यालयीन वेळापत्रकानुसार आढावा घेऊन बससेवा सुरू करावी अशी मागणी विविध स्तरातुन होत आहे.
तारकपूर आगारात बसची कमतरता. . .
अहिल्यानगर जिल्ह्याचे ठिकाण आहे. तारकपूर बसस्थानक हायटेक झाले असले तरी या हायटेक बस आगारात एकही बस नवीन नाही. दुसऱ्या आगारात वापरलेल्या बसेस तारकपूर आगारासाठी देण्यात आलेल्या आहेत. वारंवार या बसेस रस्त्यावरच बंद पडत आहेत. वेळोवेळी दुरुस्ती करून बस वापरण्यायोग्य नाहीत हे माहित असूनही नियमाचा भंग करून तारकपूर बस आगार या बसेस वापरत आहे. तारकपुर आगर व्यवस्थापक,नियंत्रक यांनी चांगल्या सुव्यवस्थेत बसेस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. जर बससेवा सुरूळीत केली नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर जनमोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महामंडळ वरिष्ठ अधिकारी,आगार व्यवस्थापक यांच्या दालनाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल.परसराम जगधने
(डॉ बाबासाहेब आंबेडकर जनमोर्चा महाराष्ट्र कार्याध्यक्ष)



