मुकादमाला लुटणाऱ्या टोळीकडून 1,50,000/- रु. किंमतीच्या चार मोटारसायकल जप्त
श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी
मुकादमाला लुटणाऱ्या टोळीकडून 1,50,000/- रु. किंमतीच्या चार मोटारसायकल जप्त
श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी
जिल्हा प्रतिनिधी : महेश चव्हाण
दि . 28/11/2024 रोजी दुपारी 12/00 वा. सुमारास फिर्यादी दारासिंग तुकाराम डावर, वय 38 वर्षे, धंदा- लेबर मुकामद मुळ रा. सपाटीया तहसिल झिरनिया जिल्हा खरगोन, राज्य मध्यप्रदेशन, हल्ली रा. नांदूर ता. राहता जि. अहिल्यानगर हे त्यांच्याकडील काम करणाऱ्या कामगाराचे पैसे देण्याकरीता कांदा मार्केट, श्रीरामपूर येथुन पाच लाख अठरा हजार रुपये घेवुन जात असताना त्यांना सात आरोपीतांनी निर्मळ यांच्या पुठ्याच्या कारखाण्याजवळील रोडवर नांदुर ता. राहता येथे फिर्यादीच्या गाडीला गाडी आडवी लावुन त्यांना लोखंडी कोयत्याचा धाक दाखवुन त्यांच्याकडे असलेली पैश्याची बॅग बळजबरीने चोरीच्या इरादयाने हिसकावुन घेवुन पळुन गेले वगैरे मजुरकाराच्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पो.स्टे गुरनं. 1117/2024 बी.एन.एस. कलम 309 (6),3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गंभीर गुन्हा दाखल होताच मा. वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे तपास पथक हे सदर गुन्हयातील गेले मालाचा व गुन्हा करणारे आरोपीतांचा शोध घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी सदरचा गुन्हा करणारे आरोपी नामे. 1) इम्रान आयुब शहा, वय 28 वर्षे, रा. आशिवार्द नगर, वॉर्ड नं.01, श्रीरामपूर जि. अहिल्यानगर, 2) आनंद अमर पवार, वय 28 वर्षे, रा. दत्तनगर, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर 3) शादाब अब्बास शेख, वय 21 वर्षे, रा.दत्तनगर ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर 4) रितेश बाबासाहेव आढाव, वय 19 वर्षे, रा. दत्तनगर ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर 5) सुरज सोपान मुठे, वय 24 वर्षे, रा. मुठे वडगाव ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर 7) ऋषिकेश उर्फ सोन्या किशोर पागिरे, वय 25 वर्षे, रा. कांदा मार्केट जवळ वॉर्ड नं.06 ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर यांना दिनांक 30/11/2024 रोजी ताब्यात घेवुन त्याच्याकडुन सदर गुन्हयातील गेला मुद्देमाला पैकी तीन लाख रुपये रोख रक्कमेसह एकुण 8,11000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्यांना श्रीरामपूर शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले होतो. सदर आरोपीतांची मा. न्यायलयाकडुन पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यांच्याकडे गुन्हयातील उर्वरीत मुद्देमालाबाबत तसेच सदचा गुन्हा करताना वापरलेल्या मोटारसायकलबाबत तसेच श्रीरामूपर शहरात घडलेल्या इतर गुन्हयाबाबत सखोल तपास केला असता त्यांच्याकडुन खालील वर्णनाच्या व किंमतीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.
1) 40,000/-रु.कि.ची एक विटकरी/ मरुन रंगाची टी. व्ही. एस. ज्युपिटर 125 स्कुटी मोटर सायकल क्रं. MH-17,DD-4742 असा असलेली सदर गाडीस समोरील बाजुस खोपडीवर ANAYA असे नाव असलेली जुवाकिंअं. (सदरचा गुन्हा करताना वापरलेली आरोपी क्रं. 1) इम्रान आयुब शहा, वय 28 वर्षे, रा. आशिवार्द नगर, वॉर्ड नं.01, अ श्रीरामपूर जि. अहिल्यानगर यांच्याकडुन जप्त करण्यात आलेली,)
2) 30000/-रु. किं.चा एक काळया व नारंगी रंगाची YAMAHA कंपनीची R15 मॉडेलची मोटर सायकल क्रं. MH-17
CB-5585 क्रमाकाची सदर गाडीस समोरील बाजुस खोपडीवर Durga II आगे आगे गोरख जागे II असे नाव असलेली जु.वा.कि.अं. (सदरचा गुन्हा करतांना वापरलेली आरोपी क्रं. 5) सुरज सोपान मुठे, वय 24 वर्षे, रा. मुठे वडगाव ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर यांच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेली.)
3)50,000/-रु.कि.ची एक सिल्वर रंगाची होंडा कंपणीची युनिकॉर्न मॉडेलची मोटर सायकल क्रं. नसलेली तिचा
इंजी.नं.KC40EA1127919 असा असलेली जुवाकिंअं. (सदर गुन्हयाव्यतिरिक्त राहता तालुक्यातुन फरार आरोपी नामे अमीत पठारे याच्यासोबत चोरी केलेली आरोपी क्रं. 4) रितेश बाबासाहेब आढाव, वय 19 वर्षे, रा. दत्तनगर ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर यांचे ताब्यातुन जप्त करण्यात आलेली) 4)30,000/-रु.कि.ची एक सफेद रंगाची होंडा कंपणीची अॅक्टीवा मॉडेलची स्कुटी मोटर सायकल क्रं, नसलेली तिचा चेसि.नं.ME4JF50AHKG211566 व इंजीन नं. GF50EG0211618 असा असलेली सदर गाडीच्या समोरील खोपडीवर PATHAN असे लाल रंगात नाव असलेली जु.वा. किं. अ. (सदर गुन्हयाव्यतिरिक्त र राहता तालुक्यातुन फरार आरोपी नामे अमीत पठारे याच्यासोबत चोरी केलेली आरोपी क्रं. 4) रितेश बाबासाहेब आढाव, वय 19 वर्षे, रा. दत्तनगर ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर यांचे ताब्यातुन जप्त करण्यात आलेलो) 1,50,000/- रु. एकुण (दिड लाख रु.) किमतीच्या चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत .
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, परि. पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोना/ शहर अहिरे, पोकों/ संभाजी खरात, पोकों/अजित पटारे, पोकों/अमोल पडोळे, पोकों/अमोल गायकवाड, पोकों/आजिनाथ आंधळे, पोकों/ सचिन दुकळे, पोकों/रामेश्वर तारडे, मपोकों/मिरा सरग पोकॉचा/ बाळासाहेब गिरी यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत