जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
वाळकी प्रतिनिधी:- दि. १५ : देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व ब्रिगेडिअर रोहित मेहता, यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला कर्नल प्रसाद मिजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे (निवृत्त), श्री चंद्रकांत शिंदे (वेल्फर वेल्फर ऑर्गनायझर अहिल्यानगर आदी उपस्थित होते.



