शेतातील संत्रा चोर मुद्देमालासह जेरबंद

शेतातील संत्रा चोर मुद्देमालासह जेरबंद
नगर / क्राईम विशेष प्रतिनिधी / शिवा म्हस्के
(दि१९)नगर तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दशमीगव्हाण शिवारातील शेतकरी पोपट पांडुरंग म्हस्के (राहणार उक्कडगाव) यांनी आपल्या संत्रा बागेत संत्रा विक्री साठी ११० मोकळे कॅरेट ठेवले होते.दि. २० फेब्रुवारी ते सकाळी ६.वाजता आपल्या शेतात संत्रा तोडण्यासाठी गेले असता सदर संत्रा बागेत फक्त १२ मोकळे कॅरेट आढळून आले व बागेतील संत्रा झाडाला नसल्याचे लक्षात आले तात्काळ त्यांनी नगर तालुका पोलिस स्टेशन येथे धाव घेत रितसर गुन्हा नंबर १०५/२०२६ बी एन,एस कलम ३०३(२) प्रमाणे रितसर गुन्हा दाखल केला . सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने नगर तालुका पोलिस स्टेशन साह्यक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे माहिती संकलन करून सदरचा गुन्हा इरफान बाबा शेख (रा.निबोंडी ता.नगर) जिल्हा अहिल्यानगर( हल्ली मुकाम मुकुंदनगर ता.नगर ) यांने त्यांच्या साथीदारासह केल्याची माहिती मिळाली सदर स़ंत्रा चोरीचा संत्रा शेंडी ता.नगर या ठिकाणी विक्रीसाठी पाठविला आहे.वरील माहितीनुसार नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांनी आपल्या तपासी पथकास माहिती दिली सदर पथकाने आरोपी ईराफन बाबा शेख यांस ताब्यात घेऊन दोन लाख किंमतीचा टेम्पो,एक लाख सोळा हजार रुपये किमतीचा संत्रा ,व चार हजार रुपये किंमतीचे कॅरेट असा एकूण तिनं लाख वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी सह जप्त केला.
सदरची कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुमेॅ, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस स्टेशनचे साह्यक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे पथकासह साह्यक फौजदार दत्तात्रय हिंगडे, पोलिस कॉन्स्टेबल शैलेश सरोदे, पोलिस हेडकॉन्स्टेबल महेश भवार, पोलिस हेडकॉन्स्टेबल नितीन शिंदे, सुभाष थोरात, मंगेश खरमाळे, रघुनाथ कुलांगे, पोलिस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग,चालक पोलीस कॉन्स्टेबल विकास शिंदे सदर पथकाने हि कारवाई केली.



