निर्मलनगर येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

निर्मलनगर येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
निर्मलनगर येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अहिल्यानगर / प्रतिनिधी
नगर : सावेडी उपनगरात प्रभाग क्र.२ निर्मलनगर येथे नगरसेवक मा .निखिलजी वारे यांच्या हस्ते झेंडावंदन करून ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . राष्ट्रगीत म्हणत राष्ट्रध्वजास उपस्थितांकडून मानवंदना देण्यात आली . यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेवक विशाल नाकोडा उपस्थित होते .
अनेक शुर वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन भारत देश स्वतंत्र केला आहे आणि म्हणूनच आपण १५ ऑगस्ट ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करत असल्याचे श्री . निखिलजी वारे यांनी सांगितले .यावेळी बंटी हिवाळे,अभिषेक खामकर, सागर गवळी , पत्रकार वाघमोडे , डॉ . ताजवे यांनी देशभक्तीपर भाषण करून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सामाजिक संदेश दिला . प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुलांना व परिसरातील नागरिकांना बिस्कीट पुडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले . तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले .
यावेळी नितीन थोरात , संभाजी गवळी, इरफान शेख , ज्ञानदेव काळे, हिवाळे अंकल,चंद्रकांत वायकर, सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी , सचिन अकोलकर, दिलीप ठाकूर , अभिषेक खामकर तसेच पुष्पा वायकर ,वर्षा गवळी आदी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .



