जळगाव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ठेकेदारी करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा :- योगेश चौधरी

जळगाव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ठेकेदारी करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा :- योगेश चौधरी
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- जळगाव येथील येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ठेकेदारी करून गरगप झालेल्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवण्याची तयारी मतदारांनी केली आहे
जिल्हा परिषद व पंचायत समितीला निवडून दिल्या नंतर काही ठराविक मंडळी खाजगी ठेकेदारी करायला लागली आहे. मोठमोठे पदे भोगूनही आपलं मतलब साध्य झाल्यावर ही मंडळी गाडीचा साधा काच देखील खाली करायला तयार होत नाहीत.
फक्त आपल्या सोबतच्या मूठभर लोकांचा फायदा करून सर्व माल बरीच मंडळी निवडून आल्यानंतर गडप करून घेत असल्याचा अनुभव लोकांना आला आहे.
यातील बऱ्याच सदस्यांनी आपापली घरेदारे भरून करोडो रुपयांची कमाई करून घेतली आहे.
आता पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरून पुन्हा जनतेला मूर्ख बनवून निवडून येण्यासाठी त्यान्ची नौटंकी सुरु झाली आहे.
आता तरी लोकांनी सावध होऊन या स्वतःचा फायदा पाहणाऱ्याना त्यांची जागा दाखवून येणाऱ्या निवडणुकीत त्याना पराभावाची चव चाखवून वारंवार तीच ती मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उभं राहण्याची गर्दी करत असेल तर वरिष्ठ नेत्यांनी देखील जुन्या कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी होत आहे.