गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे सत्संग कार्यक्रम राहुरी फॅक्टरी येथून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व पर्स चोरणाऱ्या दुसऱ्या टोळीला राहुरी पोलिसांनी केले अटक
अटकेदरम्यान दोन गुन्ह्यातील 5 व 9 ग्रॅम सोन्याचे 105000/- रू किमतीचे दोन मंगळसूत्र हस्तगत केले

गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे सत्संग कार्यक्रम राहुरी फॅक्टरी येथून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व पर्स चोरणाऱ्या दुसऱ्या टोळीला राहुरी पोलिसांनी केले अटक
अटकेदरम्यान दोन गुन्ह्यातील 5 व 9 ग्रॅम सोन्याचे 105000/- रू किमतीचे दोन मंगळसूत्र हस्तगत केले
दोन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत, आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता
राहुरी अहमदनगर वृत्तसेवा
जावेद शेख
दिनांक 31/01/2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे राहुरी फॅक्टरी येथील गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे सत्संग कार्यक्रमातून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले बाबत वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते.राहुरी पोलिसांनी तात्काळ चार संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेली रोख रक्कम, आधार कार्ड व पर्स जप्त करून तीन गुन्हे उघड केले होते.
त्यातील दुसऱ्या टोळीला तांत्रिक विश्लेषण व पोलीस निरीक्षक मा.संजय ठेंगे यांना मिळालेली गोपनीय माहितीद्वारे *1) महादेव रामदास जाधव रा. वडवणी, जि. बीड 2) रेखा दीपक पोटे व 36 रा.लिंबा रुई, ता. जि. बीड अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन,* त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना दि. 16/ 03/ 25 रोजी अटक केली असून मा. न्यायालयात हजर केले असता,चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. *त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील चोरी गेलेले 5 व 9 ग्रॅम असे दोन सोन्याचे मंगळसूत्र एकूण पंधरा ग्रॅम वजनाचे 105000/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्या आणखी साथीदारांचा राहुरी पोलीस शोध घेत आहेत .
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर,श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि. अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, सुरज गायकवाड,राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल-प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे,नदीम शेख, मपोकॉ वृषाली कुसळकर,नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनर यांनी केलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार- तुळशीदास गीते करीत आहे.