Breaking
ब्रेकिंग

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे उद्घाटन

0 8 6 5 0 8

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे उद्घाटन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३१/ करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भित्तिपत्रकाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे उद्घाटन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भित्तिपत्रकाचे कौतुक करताना डॉ. माने म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला आणि साहित्यिक जाणिवेला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे.

मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रकाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे, आनंद यादव, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, बहिणाबाई चौधरी आणि साने गुरुजी यांसारख्या नामवंत साहित्यिकांच्या साहित्यकृती, साहित्यिक कार्य आणि जीवनकार्याचा परिचय प्रभावीपणे मांडला. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने व कलात्मक पद्धतीने साकारलेल्या या भित्तिपत्रकातून मराठी साहित्याची समृद्ध परंपरा विद्यार्थ्यांसमोर उलगडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना साहित्यिकांच्या कार्याची ओळख होण्याबरोबरच वाचन, लेखन, संशोधन आणि सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळाले.

कार्यक्रमास मराठी विभागप्रमुख प्रा. नितीन तळपाडे, प्रा. प्रमोद शेटे, डॉ. वंदना भाग्यवंत, IQAC प्रमुख डॉ. अंकुश करपे, तसेच महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख, शिक्षकवृंद, कार्यालयीन अधीक्षक श्री. विजयसिंह साळुंखे, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी आवटे हिने केले, तर कु. तनुजा कोपनर हिने आभार मानले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे