माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपोषणास अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रहार कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे- मधुकर घाडगे ..

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपोषणास अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रहार कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे- मधुकर घाडगे ..
राहुरी तालुका जावेद शेख
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सुचित करण्यात येते की, दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन लागू करावे शेतकरी कर्जमाफी करावी व इतर मागण्यासाठी माजी राज्यमंत्री प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू हे स्वतः अमरावती जिल्ह्यातील मौजे मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी जवळ दिनांक 8 जून पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत..अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग. शेतकरी शेतमजूर विधवा माजी सैनिक मेंढपाळ देखील दि.11 जून रोजी राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज समाधी जवळ गुरुकुंज मोझरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती उपोषणात सहभागी होणारआहे. असे आवाहन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले आहे .