Breaking
ब्रेकिंग

रेशनकार्ड (शिधापत्रिका) संगणीकृत करण्याची मुदत तर संपत आली ! ;   मात्र तहसील (पुरवठा) कार्यालयात शिधापत्रिका संगणीकृत नाही झाली !!

शिधापत्रिका संगणीकृत करण्यासाठी कोणी नवीन ऑपरेटर येईल का हो? दिलेल्या मुदतीत शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिका संगणीकृत होईल का हो?

0 7 9 8 9 8

रेशनकार्ड (शिधापत्रिका) संगणीकृत करण्याची मुदत तर संपत आली ! ;   मात्र तहसील (पुरवठा) कार्यालयात शिधापत्रिका संगणीकृत नाही झाली !!

शिधापत्रिका संगणीकृत करण्यासाठी
कोणी नवीन ऑपरेटर येईल का हो?

दिलेल्या मुदतीत शिधापत्रिका धारकांच्या
शिधापत्रिका संगणीकृत होईल का हो?

राहुरी जावेद शेख

सर्व शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिका (रेशनकार्ड) ऑनलाईन झाले म्हणजे रेशनच्या काळा बाजारवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसून योग्य व्यक्तींनाच रेशनचा लाभ मिळणार आहे,करीता शिधापत्रिका संगणीकृत करुन घ्यावी यासाठी शासन वारंवार मुदत देत आहे,आता ३० एप्रिल २०२५ ही शेवटची मुदत असल्याचे सांगितले जात आहे,
आपले शिधापत्रिका (रेशनकार्ड) संगणीकृत करण्यासाठी बहुतांश शिधापत्रिकाधारकांनी विविध सेतु सेवा कार्यालय आणी व तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे आपले रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी गेली अनेक महिन्यांपासून दिलेले आहेत,
मात्र अद्यापही त्यांची रेशनकार्ड ऑनलाईन केली गेलेली नसल्याचे कळते, कारण याकामी संबंधित पुरवठा कार्यालयाने एक बाहेरील खाजगी इसमाची याकामी तात्पुरती संगणक ऑपरेटर म्हणून नियुक्ती केली होती असे समजते, तथा तो बाहेरील खाजगी व्यक्ती (संगणक ऑपरेटर) हा पुरवठा खात्यातील सदरील ऑनलाईनसाठी आलेल्या शिधापत्रिका (रेशनकार्ड) तथा आवश्यक कागदपत्रे घेवून परागंदा झाला असल्याची चर्चा होत असल्याने शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिका संगणीकृत होणेकामी विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु संबंधित शिधापत्रिका धारकांनी आपल्या शिधापत्रिका संगणीकृत करणेकामी जर सेतु सेवा कार्यालयामार्फत किंवा स्वतः तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे आधीच दिलेल्या आहेत,मात्र दिलेल्या मुदतीत जर त्या शिधापत्रिका (रेशनकार्ड) संगणीकृत झाल्या नाहीत किंवा मुदतीनंतर जर बाद झाल्या तर त्याची जबाबदारी ही कोण घेणार? याकरीता संबंधित कार्यालयाच्या तहसीलदार, नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक यांनी वेळीच याबाबत गांभीर्याने दखल घेवून या प्रकरणी योग्य सोक्ष – मोक्ष लावून शिधापत्रिका धारकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

*शिधापत्रिका संगणीकृत होवू नये*
*ही कोणाची काही तरी चाल आहे?*

*काही रेशन‌ दुकानदार आणी पुरवठा*
*विभागाचे हे मोठे गौडबंगाल आहे ?*

रेशनकार्ड संगणीकृत बाबत शासन मुदतीवर मुदत देत आहे आणी तहसील व पुरवठा कार्यालयाकडून रेशनकार्ड संगणीकृत करण्याचे काम बाहेरील खाजगी व्यक्ती कडून म्हणजे परसोध्यानी असल्याचे बघावयास मिळते आहे.
नेमके हे गौडबंगाल आहे तरी काय?
अधिकाधिक विलंब व्हावा आणी मनसोक्तपणे वेळ काढता यावा या उद्देशाने तर नव्हे ना जाणीवपूर्वक बाहेरील खाजगी व्यक्तीस सदरील रेशनकार्ड ऑनलाईन करण्याची कामे देण्यात आले ? ,यात रेशन दुकानदारांचा काही छुपा रोल तर नाही ना ? किंवा संबंधित तहसिल कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचा यास छुपा आशिर्वाद आहे का ? याचीही चौकशी होणे आवश्यक तथा गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
करीता शहर व तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष पदाधिकारी तथा जागरूक नागरिक यांना सदरील प्रकरणी आपले लक्ष केंद्रित करावे लागणार आहे हे मात्र खरे (क्रमशः)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे