संविधान पुस्तिकेच्या विटंबनाचा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने जाहीर निषेध
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ नगर उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
संविधान पुस्तिकेच्या विटंबनाचा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने जाहीर निषेध
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ नगर उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
प्रतिनिधी : पौर्णिमा कोमाकूल
नगर : दि .११ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भारतीय संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक नासधूस केली.उपस्थितांनी एका समाजकंटकाला तात्काळ अटक करून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटनेमुळे आंबेडकरी विचारांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या.
दलित समाज हा शांतताप्रिय व भारतीय संविधानाला मानणारा समाज आहे.शांततेने आपले जीवन जगत असताना परभणी शहर,महाराष्ट्र राज्य व भारत देश शांतपणे राहू नये म्हणून अशा प्रकारे जाणीवपूर्वक भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीला हाणी पोहोचविण्याचे काम काही समाजकंटकांनी घडवून आणलेले आहे.तरी अश्या प्रकारच्या समाजकंटकावर कठोर कारवाई करून त्यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.तसेच झालेल्या या घटनेचा अखिल भारतीय मेहतर समाज संघटना नगर व सर्व दलित समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आल्याचे निवेदन मा. उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले .
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनिभैय्या खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, सामाजिक कार्यकर्ते गोविंद घोडके,आकाश ठाकूर,विकास पंडित,दिलीप सुर्यवंशी, धिरज बैद,संजय खरे,पवन सेवक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.