Breaking
ब्रेकिंग

भेगाळली धरती, रडतो बळीराजा!

0 8 9 7 9 5

“भेगाळली धरती, रडतो बळीराजा!
===========

पाणी पाणी म्हणता कोरडी झाली नजर,
भेगाळल्या शेतात रडतोय ईश्वर!

विहिरीत नाही पाणी, डोळ्यात फक्त आस,
पिकं करपून गेली, उरली फक्त निराश!

आभाळाकडे पाहता बळीराजा थकला,
काळ्या ढगाआड कुठे पाऊस लपला?

गुरं ढोरं तहानली, चारा नाही कुठे,
पोरं बाळं उपाशी, घरात नाही फुटके!

सरकार दरबारी फक्त आश्वासनांचा खेळ,
दुष्काळाच्या छातीवर कसा बसणार मेळ?

देव पावणार कधी, हीच आहे भ्रांत,
बळीराजाच्या व्यथेला नाहीच का अंत?

– प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अहिल्या नगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 7 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे