Breaking
ब्रेकिंग

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

0 8 6 6 9 3

*प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात*

जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक एस.बी. निकम यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी समाज सुधारणा, शिक्षण प्रसार व स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या कार्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी डी. एन. पालवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एन. आर. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण पाटील, विद्या पाटील, सचिन अहिरे, सुहास खाजोडकर, नम्रता दोरकर, जयश्री पाटील, सागर पवार व प्रसाद गोसावी यांचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे