अनपेक्षित चमत्कारपूर्ण अनुभूती प्रदान करणारा सौख्य प्रदायक दत्त जन्मोत्सव सोहळा
अनपेक्षित चमत्कारपूर्ण अनुभूती प्रदान करणारा सौख्य प्रदायक दत्त जन्मोत्सव सोहळा ~श्री दत्त जागर सोहळा 2021
लेखन- ज्ञानमाऊली सोलापूर 9420705424
संगीतमय गुरुचरित्र गायनाच्या सेवेमुळे जगातील सर्वोत्कृष्ट त्रेचाळीस तासाच्या संगीतमय निर्मितीचं दान पदरात पडलं आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया हा पुरस्कार सर्वोच्च मानाचा पुरस्कार मिळाला.. खरेतर संगीतमय गुरुचरित्र गायन ही दत्त महाराजांना प्रदान केलेली अंतर मनातली एक उत्कट सेवा होती.. पुरस्कार मिळावा व रेकॉर्ड व्हावा हा त्यामागचा हेतू नव्हताच मुळी .व्हाट्सअप च्या माध्यमातून संगीतमय गुरुचरित्राचे ऑडिओ विनामूल्य निरपेक्ष वृत्तीने व्हाट्सअप फेसबुक आणी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व दत्तभक्तांना पर्यंत पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न झाला आणि महाराजांनी तो करूनही घेतला.. या संगीतमय गुरुचरित्र गायनाच्या सेवेमुळे दत्त भक्तीमध्ये रत्न आहेत अशी अनेक माणसं भेटत गेली ..अशा माणसांच्या प्रेमानं मी सुखाची अनुभूती घेत गेलो.. गुरुचरित्र पारायण सोहळा व्हाट्सअप च्या माध्यमातून सर्वदूर सातासमुद्रापार पोहोचला पण आता पुढे काय काय सेवा करायची ? हा प्रश्न होता आणि महाराजांनी गुरुचरित्र गायनाचा दत्त जागर सोहळा करण्याची आज्ञा दिली आणि 2016 रोजी मुंबईमध्ये कल्याण येथे या सोहळ्याचा श्रीगणेशा झाला.. कल्याण मध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये महाराजांनी अनेक चमत्कारिक अनुभूती दिल्य़ा.. त्यानंतर पुणे- सिन्नर ( नाशिक ) गाणगापूर सिद्धक्षेत्र यावली येथे संगीतमय गुरुचरित्र गायनाचे अर्थात संगीतमय पारायणाचे हा अत्यद्भुत सोहळे संपन्न झाले .. या पाचही ठिकाणी महाराजांनी अत्यंत दैवी अनुभूती देऊन समृद्ध केलं.. यंदाचा 2021 चा सहावा सोहळा कुठे करायचा? याबद्दल मी साशंक होतो आणि महाराजांनी आज्ञा दिली जिथं सध्या तू राहतोस ती तुझी कर्मभूमी आहे आणि त्याच ठिकाणी त्याच गावांमध्ये हा सोहळा झाला पाहिजे आणि म्हणून महाराजांच्याच आज्ञेनं उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा या गावांमध्ये हा दत्त जागरण सोहळा अर्थात संगीतमय गुरुचरित्राचा आठ दिवसीय गायन सोहळा मोठ्या चैतन्यमय वातावरणात उत्साहात पार पडला…
प्रत्येक दत्त जागर सोहळ्यासाठी जवळपास एक ते सव्वा लाख रुपये खर्च अपेक्षित असतो.. यंदा हा खर्च कसा मॅनेज करायचा ? हा एक मोठा प्रश्न होता.. पण महाराजांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत कुठल्याही सोहळ्याला अडचण आलेली नसल्याने मला संपूर्ण श्रद्धा होती की हाही सोहळा व्यवस्थित पार पडणार… सुरूवातीला गावातील काही प्रतिष्ठित मंडळींनी घरोघरी जाऊन वर्गणी मागण्याचा प्रस्ताव मांडला वर्गणी मुळे व पैशाच्या व्यवहारामुळे आत्तापर्यंत अनेक संत महंतांना अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागलेलं आहे आणि त्यांचं नावही या माध्यमातून कलुषित झालेला आहे त्यामुळे गावात सोहळा तर करायचा होता पण मला कुणाच्याही दारात देणगी मागायला जायचं नव्हत.. माझा बाबा अनंत कोटी ब्रम्हांडनायक असताना तो माझा बाप असताना मला कोणाच्याही समोर झोळी पसरायची आवश्यकता नव्हती आपल्या ज्ञानमाऊली परिवाराच्या 30 व्हाट्सअप ग्रुप मधून अनेक दत्त भक्तांनी स्वेच्छेने दत्त भिक्षा पाठवली.. म्हणून थोडाफार भार हलका झाला..4 ते 4 दिवसानंतर तळेहिप्परगा गावकऱ्य़ांच्य़ा माध्य़मातून उस्फुर्तपणे देणगीचा ओघ सुरु झाला.
संगीतमय गुरुचरित्र पारायणासाठी तळे हिप्परगा गावातून जवळपास आठ ते दहा लोकांनी पारायणासाठी नाव नोंदणी केली ..त्यातील एका भक्ताच्या मातोश्री ज्यांचे वय 113 आहे त्या अत्यंत सिरीयस असल्य़ाने इच्छा असुनही त्या पारायणास बसत नव्हत्या आमचा बोलविता धनी चालवता धनी श्रीगुरुदत्त असल्याने त्या भगिनींना सहजपणे मी म्हणालो कि
*तुम्ही काळजी करू नका दत्त महाराज पारायण होईपर्यंत काहीही होऊ देणार नाहीत*
आणि हे अनपेक्षितपणे तोंडातून निघून गेलेले बोल खरे ठरले आणि पारायण होईपर्यंत या मातोश्री अगदी ठणठणीत होत्या आणि आताही आहेत
*🔱स्वामी आले भेटीला*~~
गुरुचरित्र गायनाच्या पहिल्या दिवशी पहाटे देव पूजा करताना महाराजांना विनंती केली की महाराज हा सोहळा तुमच्या भक्ती वृद्धीसाठी मांडलेला आहे.. तुमच्या कृपेची शिदोरी समस्त ग्रामस्थांना मिळावी आणि हा सोहळा दैवी अनुभूती प्रदायक ठरावा म्हणून आपण काहीतरी संकेत द्यावा की जेणेकरून आम्हास दहा हत्तीचे बळ येईल आणि हा सोहळा अजून आनंदाने साजरा होईल… आणि महाराजांच्या जवळ केलेली ही मागणी महाराजांनी पूर्ण केली सकाळी पारायणाला बसण्यापूर्वी जवळपास अर्धा तास आधी गावातील स्वामी समर्थांची पालखी अनपेक्षितपणे न ठरवता न सांगता पारायण स्थळी येऊन पोहोचली.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जयकार करत जणू स्वामी आपल्या लेकराला आशीर्वाद देण्यासाठी प्रत्यक्ष चालून आल्याचा आनंद सर्व भक्तांना झाला आणि मलाही महाराजांनी ही अद्भुत अशी देणगी पहिल्या दिवशीच प्राप्त झाल्य़ाने माझा आनंद गगनात मावेनासा झाला.. स्वामींच्या या मंगलमय दर्शनाने पहिल्या दिवशीच्या पारायणाची स्वामीमय़ सुरुवात झाली
*पारायणास बसलेल्या महिलेची पिशाच्च बाधा महाराजांनी दूर केली*
पारायणास बसलेल्या पैकी एका भगिनीच्या अंगात 13 वर्षापासून अतृप्त शक्तीचा वास होता अनेकविध उपचार करूनही हा त्रास काही केल्या कमी होत नव्हता आणि ही महिला संगीतमय गुरुचरित्र गायनाचा या दत्त जागर सोहळ्यामध्ये सामूहिक पारायणात सहभागी झाली.. पहिल्या दिवशी खरं तर ती अतृप्त शक्ती तिला या स्थळावर बसू देत नव्हती ग्रंथाची पाने भराभर चाळणे, मधेच ग्रंथावर झोपणे, माझ्याकडे रागारागाने बघणे अशा विचित्र कृती सुरू होत्या .. पारायणाच्या दुसऱ्या दिवशी पारायण मध्यंतरात आल्यानंतर तिचे हे अंगविक्षेप अधिकच वाढले आणि त्यावेळी उच्च आसनावरून उठून खाली येऊन त्या महिलेच्या हातात गाणगापूरचा भस्म ठेवला आणि काही कळायच्या आत. तिन *मी माती खात नाही* असं म्हणत भस्म फेकून दिला यावेळी त्या महिले सोबत घडत असलेल्या विचित्र घटनेचा मला अंदाज आला .. शेजारी असलेला दोन-तीन भगिनींच्या मध्ये त्यांना पकडून तिच्या तोंडामध्ये भस्म घातलं भस्म खाल्ल्यानंतर ती भगिनी दोन-तीन मिनिटं शांत झाली आणि त्यानंतर जवळपास बरच वेळ डोळे मिटून निपचित अवस्थेत बसलेली .. जबरदस्तीने तोंडाव्दारे पोटात भस्म गेल्य़ामुळे तो दिवस आणि दुसऱ्या दिवशीचा अर्धा दिवस तिचा उलटी करण्यामध्ये गेला.. कारण तेरा वर्षाची पोटात असलेली ती नकारात्मक ऊर्जा या उलटीच्य़ा रूपाने बाहेर पडत होती त्यामुळे महाराजांची दैवी शक्ती काम करत असल्याचे जाणीव मला यावेळी झाली ..चौथ्या दिवशी पासून मात्र या महिलेच्या वर्तनामध्ये कमालीचा सुधार झाला चेहऱ्यावर जी नैराश्याची ऊर्जा होती ती कमी कमी होत चेहऱ्यावर चैतन्यदायी ऊर्जेचा प्रकाश मला दिसत होता आणि शेवटच्या दिवशी 13 वर्षाचा या संपूर्ण त्रासातून या महिलेला महाराजांनी बाहेर काढलं आणि ही माझ्यासाठी साधीसुधी अनुभूती नव्हती.. दत्त महाराजांनी एका अत्यंत चमत्कारीक अशा घटनेचा मला साक्षीदार केलेलं होतं ..नेहमी सर्वांना मी सांगत असतो की गुरु चरित्र म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत आणि गुरुचरित्राच्य़ा पारायणामुळे अनेक असाध्य व्याधी दूर होतात.. वास्तुदोष दूर होतात मनोवांछित कामना सफल होतात त्याचच हे जिवंत उदाहरण होतं…
*भक्ती गीत गायन आणि विवेचना मुळे संगीतमय पारायणात रंग भरला*
संगीतमय गुरुचरित्राचे पारायण करत असताना अधून मधून त्या-त्या प्रसंगानुसार भजन सादर व्हायचे, भक्ती गीत सादर व्हायचे अनेकविध रागदारी मध्ये दिगंबरा दिगंबरा चा जयघोष व्हायचा आणि अशा या चैतन्यमय वातावरणामुळे आनंदाचा बहार फुलाय़चा .. गुरुचरित्रात येणाऱ्या प्रसंगाचे त्या-त्यावेळी सोप्या शब्दात विवेचन केल्यामुळे सुरुवातीला असलेली मोजक्या लोकांची उपस्थिती वाढू लागली.. संध्याकाळच्या महाआरतीला बघता बघता असंख्य भगिनी गर्दी करू लागल्या आणि हनुमान मंदिर बसायला सगळ्यांना अपूर्ण पडू लागल.. गुरुचरित्राची दैवीशक्ती यावेळी काम करू लागली घरा घरात पोहोचणाऱ्या आवाजामुळे अनेक जण आपल्या घरातून निघून मंदिरात येऊन बसू लागले आणि खऱ्या अर्थानं या सोहळ्याला अजून रंग चढू लागला
*🛕महाबली मारुतीरायाचे वानर रूपात आगमन*
संगीतमय गुरुचरित्र गायनाचा सोहळा दरवर्षी वेगवेगळ्या स्थानावर दत्त मंदिरात होत असतो दत्त महाराजांच्या सानिध्यात होत असतो.. मात्र हा पहिलाच सोहळा असा होता की माझे इष्ट देव माझे सर्वस्व महाबली मारुती राया च्या मंदिरात संपन्न होत होता.. आजच्या सातव्या दिवशी च्या सत्रात सुरुवात करताना हनुमान चालीसा ने सुरुवात झाली.. तीन ते चार रागांचा आधार घेत अत्यंत भावपूर्ण आणि जोशपूर्ण अशा वातावरणात हनुमान चालीसा ला रंग भरला.. हनुमान चालीसा म्हणत असतानाच श्रीराम जय राम जय जय राम चा मोठा घोष होऊ लागला आणि हे संपूर्ण वातावरण क्षणात रामनामाने भारावून गेलं…
राम नामावलीत तल्लीन असताना मारुतीरायाला एक प्रश्न केला आणि म्हटलं की
*अहो मारुतीराया आत्तापर्यंतचे सगळे सोहळे दत्त महाराजांना ऐकवले पण प्रथमच हा सोहळा तुमच्या सानिध्यात होतोय तुम्हाला ऐकवण्य़ामध्ये मला धन्यता वाटते आणि खरंच तुम्ही ऐकत आहात की नाही?*
असा प्रश्न केला आणि मग त्यानंतर सारं वातावरण शांत झालं आणि पारायण संपल्यानंतर महाआरती झाली आणि महारथी झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्याठिकाणी बजरंग बली चे वानर रूपात आगमन झाले आणि जणू त्यांनी पावती दिली की *होय मी हा सोहळा ऐकतोय मी तुमचं गायन ऐकतोय* आणि या चमत्कारिक कृतीमुळे माझ्यामध्ये दहा हत्तीच बळ आलं आणि आपली सेवा मारुतीराया पर्यंत पोहोचली याचा ही अत्यंत आनंद झाला..
*भक्तिमय उत्साहात पूर्णाहूती सोहळा संपन्न झाला*
संगीतमय गुरुचरित्र गायनास महिलांची असंख्य उपस्थिती पाहून महिलांनाही काहीतरी सेवा द्यावी असे मनात आले आणि 56 भोग करण्याची प्रेरणा महाराजांनी दिली आणि त्यानुसार सर्व महिलांना 56 भोग बनवण्याविषयी सुचित केले आणि पारायणाच्या सातव्या दिवशी रात्री महा आरतीच्या वेळी महाराजांना 56 भोग चा प्रसाद चढवला आणि त्याच बरोबर दीपोत्सवाकरिता कणकेच्य़ा दिव्य़ांचा दीपोत्सव करण्य़ाची इच्छाही मांडली त्य़ानुसार माताभगिनींनी करून आणलेल्या असंख्य़ पणत्य़ांच्य़ा दिपोत्सवामुळेही दत्तजागर सोहळ्य़ात रंगत आली.. कणकेच्या पणतीत दिवा लावल्याने .आपले दैन्य दारिद्र्य दूर होत असते म्हणून सर्व महिला भगिनींना कणकेचे दिवे करून आणावयास सांगितले होते आणि या आवाहनानुसार सर्व महिलांनी असंख्य महिलांनी असंख्य दिवे यावेळी करून आणले आणि हा दीपोत्सव सोहळाही संपूर्ण तळे हिप्परगा गावात तेजोमय करून गेलं
संगीतमय़ गुरुचरित्र गायनाच्या पहिल्या दिवशी जसं स्वामींनी प्रत्यक्ष हजर होऊन सोहळ्यास संमती दिली सोहळ्यासाठी ग्रीन सिग्नल दिला अगदी तसाच शेवटच्या समाप्ती दिवशीही सकाळी अनपेक्षितपणे परत एकदा स्वामींची पालखी आली आणि योगायोगानं स्वामींनी जणू सात दिवस आणि हा सोहळा ऐकला असल्याची पावती आम्हाला दिली…
दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी दत्त जन्माचा अध्याय आणि अवतरणिकेचे वाचन झाल्यानंतर सर्व पारायणास बसलेल्या पारायण कर्त्य़ांचा यावेळी सन्मान करण्यात आला.. त्याचबरोबर श्री गुरुचरित्र ग्रंथाचेही नववस्त्र देऊन पूजन करण्यात आले …जलकुंभ घेतलेल्य़ा 21 सुवासिनी आणि पारायणकर्त्य़ांनी डोक्यावर गुरुचरित्राचा ग्रंथ घेऊन भजनी मंडळाच्या श्रवणीय नादब्रम्हा मध्ये संपूर्ण तळे हिप्परगा गावातून ग्रंथदिंडी परिक्रमा सुरू झाली.. मृदंगाच्या तालावर पडणारी श्री पुरुषांची पावलं त्याच बरोबर महिला भगिनींनी घातलेल्या फुगड्यामुळे ग्रंथ दिंडी चा सोहळा ही अवर्णनीय असा झाला *दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा* च्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेलं ग्रंथदिंडी झाल्यानंतर दुपारी 11 ते 12 या वेळेत दत्त जन्माचा पाळणा संपन्न झाला.. माझ्या गुरुमाई परमपूज्य मीनाताई राघवेंद्राचार्य जोशी (गुरुमाऊली) यांच्या उपस्थितीत पाळणा सोहळ्य़ास रंगत आली .. माईंनी गायलेल्या पाळण्यामुळे या सोहळ्यास आणखीनच शोभा आली .. दत्त जन्माच्य़ा पाळण्य़ानंतर महाआरती संपन्न झाली.. यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित बंधू-भगिनींची विलक्षण उपस्थिती होती मंदिरासमोरील संपूर्ण परिसर गर्दीने तुडुंब भरलेला होता..तळे हतळ्य़ाच्य़ाे तळ्य़ाच्य़ा काठी वसलेलं असल्य़ाने तळ्य़ाशेजारी गौशाळा असावी अशी मनात बऱ्य़ाच दिवसापासुन सुक्ष्म इच्छा होती …य़ा सोहळ्य़ादरम्य़ान गावातील एक हॉटेल व्य़ावसाय़िक. श्री भोसले य़ांनी तळ्य़ाकाठची 2.गुंठे जागा ज्ञानमाऊली परिवारास दान करण्य़ाचेही जाहिर केले …
*महाप्रसादास लाभली अन्नपूर्णेची महाकृपा*
सुरूवातीपासूनच गावातील जास्त लोक प्रसाद घेण्यास येणार नाही अशा अफवेमुळे आम्ही जवळपास दबकतच आठशे लोकांचा प्रसाद बनवला आणि महाप्रसादास गावातील अनेक आबालवृद्धांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि पाहता पाहता बारा ते चार या वेळेमध्ये जवळपास दीड हजार दत्त भक्तांनी महाप्रसाद घेतला.. विशेष म्हणजे इतक्या लोकांनी प्रसाद घेऊन सुद्धा भरपूर प्रसाद शिल्लक राहिला होता आणि म्हणून गावकऱ्यांना विनंती केली की आपण भांडी आणावीत आणि भांड्यामध्ये हा प्रसाद संध्याकाळसाठी घेऊन जावा दत्त महाराजांचा सोहळा असल्यामुळे माता अन्नपूर्णणेनही भरभरून आशीर्वाद दिला…आणि ह्या महाप्रसादात भव्य अशी हरकत लाभली..
समाप्ती चे गायन करताना उर अत्यंत भरून आलेला होता.. कंठ सद्गदीत झाला होता.. दाटून आलेला होता.. आजचा हा शेवटचा दिवस ..यानंतर आपल्याला उद्यापासून गायन करावयास मिळणार नाही ही गर्दी बघायला मिळणार नाही हा सोहळा आपल्या डोळ्यांना परत पुढच्या वर्षी बघायला मिळणार आणि या दुःखानं डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते दत्त जागर सोहळा हा नुसताच कार्यक्रम न ठरता एक दैवी अनुभूती देणारा सोहळा चैतन्यदायी सोहळा ठरला….
लेखन – ज्ञानमाऊली सोलापूर 9420705424
🔱अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त 🔱


