Breaking
ब्रेकिंग

91व्या अल्पवयीन मुलीचा राहुरी पोलिस पथकांनी घेतला शोध*

अपहरणादरम्यान केलेल्या लैंगिक अत्याचाराने मुलगी आठ महिन्यांची गर्भवती*

0 7 6 9 3 7

*91व्या अल्पवयीन मुलीचा राहुरी पोलिस पथकांनी घेतला शोध*

*अपहरणादरम्यान केलेल्या लैंगिक अत्याचाराने मुलगी आठ महिन्यांची गर्भवती*

राहुरी तालुका जावेद शेख

दि.18/10/2024 रोजी श्रीरामपूर तालुक्यातील सोळा वर्षीय मुलगी राहुरी तालुक्यात मामाच्या गावी आलेली असताना तिचे अज्ञात इसमाने अपहरण केले बाबत तिचे मामाने राहुरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) प्रमाणे तक्रार दाखल केली होती .
दाखल गुन्ह्याचा मागील वर्षभरापासून शोध घेऊनही ती मिळून येत नसल्याने परत नव्याने सदर गुन्ह्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ व लेखनिक सतीश आवारे यांनी गोपनीय माहिती तथा तांत्रिक विश्लेषण करत सदर अप – हरित मुलीचा 14/10/2025 रोजी नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे शोध घेऊन तिचे अपहरण करणारा आरोपी नामे रोहित अनिल अमोलिक ,वय 21 वर्ष राहणार भोकर तालुका श्रीरामपूर याच्या ताब्यातून सुटका केली .सदर आरोपीने *अपहरणानंतर तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचारातून ती गर्भवती असल्याने भारतीय न्यायसंहिता कलम व पोस्को कलम वाढ* करून सदर आरोपीस आज रोजी अटक करून उद्या मान्य न्यायालयापुढे पोलिस कस्टडी रिमांड कामे हजर ठेवत आहे . *तपासादरम्यान सदर अपहरणा करिता मदत करणाऱ्या सर्व आरोपींची माहिती काढून ज्यांनी ज्यांनी अपहरणास मदत केलेली आहे त्यांनाही सदर गुन्ह्यात आरोपी करून अटक करणार आहे* .
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अद्याप पर्यंत अपहरित 91 मुलींचा शोध घेण्यात आलेला आहे .

सदर कारवाई मा. सोमनाथ घाडगे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ पोलीस लेखनिक हवालदार सतीश आवारे ,पोलीस नाईक अशोक कुदळे ,चालक पोलीस शिपाई पठाण , महिला पोलीस अंमलदार मीना नाचन तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अभिजीत आरकल व पोलीस नाईक आप्पासाहेब हिंगे तसेच मोबाईल सेलचे सचिन धनाड व पोलीस नाईक रामेश्वर वेताळ यांनी केली आहे .

सदर गुन्ह्याबाबत तसेच इतर काही माहीती दयावयाची असल्यास श्री. पोनि, संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन संपर्क – 8788891147 वर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे