महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्ष पदी ज्ञानदेव उर्फ दिपक काकडे यांची निवड
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्ष पदी ज्ञानदेव उर्फ दिपक काकडे यांची निवड
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २४/ वडशिवणे गावचे रहिवाशी असलेले ज्ञानदेव उर्फ दिपक काकडे यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्ष पदी पदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रदेश कार्यालय इंदापूर याठिकाणी दि. २२/१२/२०२४ रोजी कार्यकर्ता मेळावा, जाहीर पक्षप्रवेश व नूतन पदाधिकारी निवडी असे कार्यक्रम पक्षप्रमुख मा. संजय भैय्या सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर नूतन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
करमाळा तालुक्यतूनही मोठ्या संख्याने कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांचा परिचय करून घेतल्यानंतर पक्षप्रमुख मा. संजयभैय्या सोनवणे यांनी करमाळा तालुक्यात गेली २० वर्षापासून आंबेडकरी चळवळीत निस्वार्थीपणे काम करणारे, तालुक्यातील जनतेशी दांडगा जनसंपर्क असणारे, अभ्यासू, प्रशासनाची माहिती असणारे व प्रशासनावर वचक असणारे, सर्वसामान्यांची काम करून घेण्याची धमक असणारे एक धाडसी नेतृत्व लक्षात घेता वडशिवणे गावचे रहिवाशी असलेले ज्ञानदेव उर्फ दिपक काकडे यांची करमाळा तालुका अध्यक्ष पदी निवड केली. तालुका अध्यक्ष पदी निवडीचे पत्र देवून काकडे यांना पक्षवाढीसाठीच्या पुढील कार्यास शुभेच्या दिल्या.
करमाळा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीला गोरगरीब जनतेची निस्वार्थपणे काम करणाऱ्या अभ्यासू व धाडसी व्यक्तीची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने तालुका अध्यक्ष पदी निवड केल्यामुळे करमाळा तालुक्यातील अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, मित्र परिवार व जनतेतून ज्ञानदेव उर्फ दिपक काकडे यांच्यावर शुभेछानचा वर्षाव होत आहे.
आंबेडकरी चळवळीत काम करीत असताना काकडे यांनी विविध पदांवर काम केले आहे. सध्या ते उपविभागीय दक्षता नियंत्रण समिति माढा उपविभाग, माढा चे अशासकीय सदस्य आहेत. परिवर्तन न्यूज लाईव या चॅनेल चे मुख्य संपादक म्हणून ही ते काम पाहत आहेत.