Breaking
ब्रेकिंग

श्रीराम पायी दिंडी सोहळ्याचे उक्कडगांव ते पंढरपुर कडे प्रस्थापन

0 8 6 5 0 9

श्रीराम पायी दिंडी सोहळ्याचे उक्कडगांव ते पंढरपुर कडे प्रस्थान

प्रतिनिधी : बाबु तिपुळे

आषाढी वारीनिमित्त उक्कडगांव येथील वारकर्यच्या दिंडीचे आज कनिफनाथ मंदिरातून उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपुरकडे प्रस्थान झाले .
ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात दिंडी मार्गस्थ झाल्याने परीसर भक्तिमय झाला होता
दिंडीत सहभागी झालेल्या पुरुष वारकर्यांच्या हातात टाळ असुन ते अभंग आणि हरिनामाचा गजर करीत मार्गक्रम करत होते . महिला वारकर्यांनी डोक्यावर तुळसी वृदांवन घेऊन पारंपारीक वेशभूषेत सहभागी झाले होत वारकर्यांची परंपरा जपली पांडुरंगाच्या प्रतिमेने सजवलेला रथही दिंडीसोबत आकर्षक केंद्रबिंदु ठरला रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली .
दिंडीच्या प्रस्थानावेळी ग्रामस्थ भाविक आणि विठ्ठल भक्तांनी शुभेच्छा देत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली
विठ्ठल रखुमाईच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला भक्तिभाव शिस्तबद्ध दर्शन घडत दिंडी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली .

यावेळी उपस्थित गावचे सरपंच नवनाथ म्हस्के दिंडी चालक पोपट माने शिवाजी म्हस्के बाळु पाटील भाऊसाहेब म्हस्के जालिंदर तिपुळे नाथा साठे अंकुश तिपुळे कचरू शिंदे पुष्पा म्हस्के वैशाली तिपुळे आदी भाविक भक्त व उक्कडगांव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे