Breaking
ब्रेकिंग

करमाळा येथील तालुकास्तरीय दांडपट्टा स्पर्धेमध्ये महात्मा गांधी विद्यालयातील प्रणव होनप यास प्रथम क्रमांक

0 3 9 0 2 3

करमाळा येथील तालुकास्तरीय दांडपट्टा स्पर्धेमध्ये महात्मा गांधी विद्यालयातील प्रणव होनप यास प्रथम क्रमांक

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २४/ करमाळा येथे तालुकास्तरीय दांडपट्टा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील 22 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात महात्मा गांधी विद्यालयातील प्रणव होनप या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला. सदर स्पर्धा करमाळा येथील कर्मवीर आण्णसाहेब जगताप विद्यालय मध्ये संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्यामधून विविध शाळेमधील 250 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. सर्व विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छां देण्यात आल्या. तसेच प्रशिक्षक नागनाथ बोळके सर यांचेही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांनीही विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

या सर्व स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व पालक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सहकार्य लाभले. सहकार्याबद्दल सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. असेच सर्वांचे सहकार्य लाभावे हीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद – – – – प्रशिक्षक श्री नागनाथ बोळगे सर ( तलवारबाजी, दांडपट्टा शिवकालीन युद्ध कला)

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे