लासलगाव च्या कुंदन चावरीया याची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा दया – – अहिल्यानगर पोलिस अधीक्षकांना निवेदन
निषेध निषेध निषेध निषेध निषेध
निषेध निषेध निषेध निषेध निषेध
लासलगाव च्या कुंदन चावरीया याची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा दया – – अहिल्यानगर पोलिस अधीक्षकांना निवेदन
प्रतिनिधी : धीरज लांडगे
बुधवार दिं- १७/९/२०२५ रोजी लासलगाव येथील दलित वाल्मिकी मेहतर समाजाचा युवक मयत कुंदन नरेश चावरीया वय १७ वर्षीय या तरुणाचे गावातल्या संतोष पंडित जाधव या प्रतिष्ठित उच्च जातीच्या मुलीच्या प्रेमसंबंध असल्याने त्या बाबत मुलीच्या कुटुंबायांनी सदर प्रेम प्रकरण समजल्यावर त्यांनी मुलीच्या माध्यमातून मयत कुंदन नरेश चावरीया या संपर्क साधून भेटायला बोलून मुलीच्या कुटुंबियांनी कुंदन याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्दयपणे त्याची हत्या केली सदरची घटना ही मानव जातीला लाजिरवाणी बाब आहे.आजहि या देशात जातियवाद संपलेला नाहीत यापूर्वी खैरलांजी,सोनई, खर्डा आणि आता लासलगाव असे कृत्य करणाऱ्यांना देशातील संविधान आणि न्यायव्यवस्थेने त्यांना मृत्यूदंडची शिक्षा दिली पाहिजे.या घटनेचा निषेध व्यक्त करत आज अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या वतीने अहिल्या नगर जिल्ह्यातील पोलिस उपविभागीय अधिकारी मा.टिपरसे साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी संघटनेचे *जिल्हाध्यक्ष सनी भैय्या खरारे , जिल्हा सचिव अर्जुन चव्हाण ,ऑल इंडिया कुस्ती च्यापियन पै.अनिल वाने*, *जिल्हा सचिव संतोष सारसर, जिल्हा उपसचिव अजय सौदे, सामाजिक कार्यकर्ते ,कुणाल बैद,विक्की करोलिया,सचिन चव्हाण,मयूर चव्हाण*,आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



