८०-९० च्या सुवर्णकाळाची भन्नाट जादू ! महेश घावटे प्रस्तुत ‘सरगम गीतमाला’ ने अहिल्यानगरकरांना केले मंत्रमुग्ध

८०-९० च्या सुवर्णकाळाची भन्नाट जादू ! महेश घावटे प्रस्तुत ‘सरगम गीतमाला’ ने अहिल्यानगरकरांना केले मंत्रमुग्ध
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : संगीतप्रेमींसाठी रविवारची सायंकाळ म्हणजे केवळ एक वेळ नव्हती, तर आठवणींच्या हळुवार प्रवासाची एक अविस्मरणीय सफर होती! प्रोफेसर कॉलनी चौकातील हॉटेल रोज गोल्ड येथे महेश घावटे प्रस्तुत ‘सरगम गीतमाला’ हा ८० आणि ९० च्या दशकातील सदाबहार हिंदी गीतांचा संगीतमय सोहळा एवढ्या दणक्यात आणि जल्लोषात पार पडला की, उपस्थितांच्या अंगावर काटा आणि ओठांवर फक्त ‘वन्स मोअर’चाच गजर होता!
संकल्पना, नियोजन आणि सादरीकरण या तिन्हींचा असा काही त्रिवेणी संगम महेश घावटे यांनी साधला होता की, संपूर्ण रोज गोल्ड सभागृह संगीतमय ऊर्जेने थरथरून गेले!
मंचावर एकापेक्षा एक दिग्गज गायकांनी अवतरत सुरांचे असे काही वादळ निर्माण केले की श्रोते जागेवर थिरकायला मजबूर झाले.
अहिल्यानगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी व कल्याणासाठी अविरत कार्य करणाऱ्या ‘प्रयास ग्रुप’च्या अध्यक्ष अलकाताई मुंदडा यांनी संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत आवर्जून उपस्थित राहून या संगीतमय सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
अहिल्यानगरच्या संगीतप्रेमींचे खऱ्या अर्थाने ‘कुबेर’ मानले जाणारे डॉ. दमण काशीद सर यांनी रसिकांच्या आणि उपस्थितांच्या आग्रहाखातर स्वतः मंचावर उतरून सुरेल गायन केले. त्यांनी डॉ. गायत्री काशीद यांच्यासोबत ‘इस दिल मे क्या है’ आणि प्रतिभा साबळे यांच्यासोबत ‘टुकुर टुकुर देखते हो क्या’ गात सुरेल जुगलबंदीचा अप्रतिम नमुना सादर केला.
महेश घावटे: स्वतः मंचावर उतरून ऍड. किरण जाधव यांच्या साथीने ‘कितना प्यारा तुझे’ व ‘परदेसी परदेसी जाना नही’, तर नीता गडाख मॅडम यांच्यासोबत ‘वादा रहा सनम’ गाऊन आपल्या सुरेल आणि दमदार आवाजाने संगीताचा असा माहौल तयार केला की प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला! महेशजींचे नेतृत्व आणि संगीतावरील पकड वाखाणण्याजोगी होती.
नरेश पेवाल: ‘मुझे रात दिन’ आणि ‘दिवाना मै चला’ मधून आपल्या मखमली आवाजाची जादू दाखवली.
प्रमोद सूर्यवंशी (‘घर से निकलते ही’) आणि भानुदास महानूर (‘मैने पुछा चांद से’) यांनी ९० च्या दशकातील रोमँटिक वातावरण क्षणार्धात जिवंत केले.
सारंग पंधाडे (‘हम्मा हम्मा’, ‘कोई ना कोई चाहिए’), चारुदत्त ससाणे (‘पेहली पेहली बार जब प्यार’) आणि निलेश महाजन (‘जादू तेरी नजर’) यांच्या आवाजातील फ्रेशनेसने सभागृहात नवी ऊर्जा भरली.
अजित रोकडे सरांनी ऍड. किरण जाधव यांच्यासोबत ‘एक दिन आप युं’ आणि नीता गडाख मॅडम यांच्यासोबत ‘आके तेरी बाहों मे’ गात रसिकांना प्रेमाच्या धुंदीत बुडवले.
सुशील देठे यांनी मंचावर अक्षरशः आग लावली! ‘वो लडकी जो सबसे अलग है’, ‘ये गो ये ये मैना’, ‘या अली’, ‘बादशहा ओ बादशहा’ आणि मोनाली बोरुडे यांच्यासोबत ‘ऐसी दीवानगी’ गात त्यांनी असा काही परफॉर्मन्स दिला की संपूर्ण हॉलमध्ये एकच जल्लोष पसरला. Monaali बोरुडे यांनी ‘हवा हवाई’ गाण्यावर गायनाबरोबर जोरदार नृत्याचा धमाका केला! तसेच त्यांनी रोनीत सुखधन (‘दिल ने ये कहा है दिल से’), राजेन्द्र शहाणे (‘आप के आ जाने से’), बाबासाहेब जगताप (‘तुम पर हम है अटके यारा’) आणि किशोर जाधव (‘वो तो है अलबेला’) यांच्यासोबत दिलेल्या ड्युएट सॉंग्सने स्टेजवर धुमाकूळ घातला.
श्री व सौ भिंगारदिवे यांचे ‘बाजीगर ओ बाजीगर’ हे युगल गीत जोडप्यांमधील प्रेमाचे प्रतीक ठरले. डॉ. नितीन जगताप व साक्षी धोकटे (‘हम तो दिवाने हुए यार’) आणि निलेश महाजन व डॉ. गायत्री कुलकर्णी (‘धक धक करने लगा’) यांच्या सादरीकरणावर प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्यांची खैरात केली.
अजय आदमाने (‘संभाला है मैने’, ‘मेरा चांद मुझे’), जीवन महाजन (‘मै तो रस्ते से जा रहा था’), डॉ. अशोक नरवडे (‘पेहला पेहला प्यार है’), अजित माने व साक्षी धोकटे (‘दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है’) आणि श्रीशैल शिवगुंडे (‘मतलबी है लोग यहां पर’) या सर्वच कलाकारांनी आपल्या आवाजाची छाप सोडली.
हा कार्यक्रम जेवढा व्यावसायिक आणि दर्जात्मक दृष्टीने उत्तम होता, तितकाच तो कौटुंबिक ऊब आणि परस्परांमधील अतूट विश्वासाचे एक सुंदर प्रतीक ठरला. कार्यक्रमादरम्यान प्रक्षेप सोमवंशी यांनी आपल्या मुलीला आग्रहाने मंचावर बोलवून तिच्यासोबत केलेला छान डान्स उपस्थितांची मन जिंकून गेला. एकमेकांवर असलेल्या अथांग विश्वासाच्या बळावर कलाकारांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी मोकळेपणाने आनंद लुटला!
महेश घावटे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
एकापेक्षा एक सरस ३६ गाण्यांचे नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि प्रत्येक कलाकाराला दिलेले योग्य व्यासपीठ यामुळे महेश घावटे हे केवळ एक उत्कृष्ट गायकच नाहीत, तर अहिल्यानगरच्या सांस्कृतिक विश्वातील एक महामेरू आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. असा ग्रँड, ऐतिहासिक आणि दणकेबाज शो आयोजित करून त्यांनी नगरकरांच्या मनात आपली एक खास आणि आदराची जागा निर्माण केली आहे.
महेश घावटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या अविस्मरणीय, धमाकेदार आणि सुपर-डुपर हिट संगीतमय सोहळ्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि खूप खूप अभिनंदन!शब्दांकन :
शिवाजी साळवे
मो . ९८२२९६४८९५


