शेतात जाणाऱ्या दाम्पत्याच्या मोटरसायकला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिल्याने महिला ठार व पतीची प्रकृती चिंताजनक

शेतात जाणाऱ्या दाम्पत्याच्या मोटरसायकला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिल्याने महिला ठार व पतीची प्रकृती चिंताजनक
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर : शेतात जाणाऱ्या दाम्पत्याच्या मोटरसायकल ला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक देऊन फरफटत नेले. महिला ठार झाली असून तिच्या पतीची प्रकृती चिंताजनक आहे. अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील मुरलीधर रामचंद्र पाटील व लता मुरलीधर पाटील हे दोघे मोटरसायकलवर शेतात दहिवद कडे जाताना समोरून चोपड्याकडून अमळनेर कडे येणाऱ्या यावल च्या बस क्रमांक एम एच २० बी एल २६५६ ने जोरदार धडक देऊन मोटरसायकलसह पती पत्नीला तब्बल १०० मीटर ओढून नेले. मोटरसायकल बस खाली आल्याने नागरिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात आले. लताबाई गंभीर जखमी झाली होती.
१०८ रुग्णवाहिका तात्काळ हजर होऊन डॉ इम्रान कुरेशी यांनी दोघांवर तातडीने उपचार करून ग्रामीण रुग्णालयात आणले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळ्याला हलवण्यात आले. महिलेचा मृत्यू झाला तर मुरलीधर यांनाही धुळे येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ व हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व पुढील तपास करीत आहेत.