Breaking
ब्रेकिंग

श्री कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी श्री किशोर गाढवे यांचे कडून २५,०००/ ₹. देणगी कमला भवानी चरणी अर्पण

0 8 9 6 7 5

श्री कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी श्री किशोर गाढवे यांचे कडून २५,०००/ ₹. देणगी कमला भवानी चरणी अर्पण

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २०/ करमाळा येथील श्री कमला देवी मंदिर जीर्णोद्धारासाठी दि. १९/१०/२०२६ रोजी बारामती येथील सुप्रसिद्ध बिल्डर व व्यावसायिक श्री किशोर गाढवे व सौ. सोनाली चिवटे-गाढवे रा. बारामती यांच्या कडून २५,०००/ ₹. भव्य देणगी श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन कामस प्राप्त झाली. यावेळी श्री कमला देवी मंदिर समितीकडून मंदिर समितीचे विश्वस्त सुशील राठोड यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गाढवे परिवार, मानकरी, सेवेकरी, भक्तगण इत्यादी उपस्थित होते.

श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.

श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट करमाळा यांचे कडून करण्यात आलेले आहे. तसेच ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध आहे.

देणगीसाठी संपर्क:- अशोक गाठे व्यवस्थापक. मो. नं. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे