Breaking
ब्रेकिंग

आराध्य दैवत शेरखावली बाबांचा सालाबादप्रमाणे भव्य यात्रा उत्सव

0 7 6 9 4 3

आराध्य दैवत शेरखावली बाबांचा सालाबादप्रमाणे भव्य यात्रा उत्सव

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी तालुक्यातील कानडगांव पंचक्रोशीचे आराध्य दैवत शेरखावली बाबांचा सालाबादप्रमाणे याही वर्षी १ ते ३ जानेवारी या कालावधीत भव्य यात्रा उत्सव साजरा होत आहे.
यानिमित्त कार्यक्रम दि.१ जानेवारी रोजी भव्य असा संदलचा कार्यक्रम शेरखावली बाबा ट्रस्ट च्या वतीने गावातुन संदल ची मिरवणूक काढली जाते.
२ जानेवारी रोजी रात्री कानडगांव ग्रामस्थ च्या वतीने छबिना मिरवणूक व भव्य शोभेंच्या दारूची आतषबाजी व रात्री ९ वा. बहुरंगी लोकनाट्य तमाशा.
३ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. कलाकारांच्या हजेरीचा कार्यक्रम व दुपारी २ वा. नामांकित पैहिलवानांच्या जंगी कुस्ती हगाम्यांचा कार्यक्रम होणार आहे.
शेरखावली बाबा हे पंचक्रोशीचे आराध्य दैवत असुन जागरूत देवस्थान असल्याने राज्यभरातील भाविक येतात व दर्शनाचा लाभ घेतात या यात्रेत अनेक प्ररकारचे खेळणे दुकाने, कटलरी , रहाट गाडगे अशी अनेक दुकाने येथे येतात. परिसरातील सर्वात मोठी यात्रा असल्याने गर्दी खुप असते, काडगाव ग्रामस्थ व ओ शेरखावली बाबा यात्रा कमिटीकडून यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे