अमळनेर मतदारसंघात ८० % कामे मंजूर ; पण प्रत्यक्षात काम किती मार्गी लागली हा मोठा प्रश्न :- दिपक पाटील

अमळनेर मतदारसंघात ८० % कामे मंजूर ; पण प्रत्यक्षात काम किती मार्गी लागली हा मोठा प्रश्न :- दिपक पाटील
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- .अमळनेर मतदारसंघात ८० % काम मंजूर झाली.पण प्रत्यक्षात किती काम झाली. कुठे एक वर्षं तर कुठे दोन वर्षे झाली.भुमी पूजन करून अद्याप त्या ठिकाणी कोणत्याच कामाची सुरुवात नाही. व्यायाम शाळेचा मुद्दा घेतला तर जास्तीत जास्त भूमी पुजन झाल.तरी अजून व्यायाम शाळेचे काम कुठे पूर्ण झाले आहे. अनेक मुद्यांवर विचार केलाच तर शब्द अपूर्ण पडतील तशी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर अवस्था करून ठेवली आहे. रस्त्याच्या विचार केला तर जनतेला सहज लक्षात येते की इस्टेमेट नुसार काम होत नाही फक्त घोटाळेबाज पणा चालतं आहे.
महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांच्या कडे जनतेने या गोष्टीची तक्रार केली आहे. दिपक पाटील वाघोदेकर यांनी दखल घेतलेली आहे.मग असा पण विचार जनतेला येतो मतदान घेण्यासाठी आले. हि खूप मोठी नाराजीची बाब आहे. असचं होत राहलं तर पुढे भविष्यात आमदारीकीसाठी नवा चेहरा नक्की असेल व जनता देखील त्यावेळी विचार करुन मतदान करणार जनता ठरवेल तोच अमळनेरचा तरुण तडफदार आमदार असेल.कारण जनतेला आमदार नको तर विकास कामे करणार आमदार पाहिजे तसेच शेतकऱ्यांचा विचार करणार आमदार पाहिजे व ते जनता ठरणारचं