निर्मलनगर येथे पारंपारिक पद्धतीने सामूहिक होळी साजरी
८५ वर्षीय जेष्ठ नागरिक अविरतपणे जपत आहे होळीची परंपरा
निर्मलनगर येथे पारंपारिक पद्धतीने सामूहिक होळी साजरी
८५ वर्षीय जेष्ठ नागरिक अविरतपणे जपत आहे होळीची परंपरा
प्रतिनिधी : आसावरी वायकर
होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणारा होळी पोर्णिमा सण होळी पेटवून साजरा केला जातो . निर्मलनगर परिसरातील महिलांनी पारंपारीक पद्धतीने विधिवत होळीची आरती करून कुटुंबाच्या व समाजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करून होळी पूजन केले . होळी उत्सवासाठी दरवर्षी अविरत अखंडपणे परिसरातुन लाकडे गौऱ्या जमा करणारे जेष्ठ नागरिक श्री . चंद्रकांत वायकर यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली .

शहरात राहूनही पारंपरिक उत्सवातून पिढ्यानपिढ्या संस्कृतीचे जतन करून वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने वायकर परिवारातर्फे सामूहिकपणे होळी साजरी करण्याची प्रथा जोपासली जात आहे .
गाडेकर चौकातील पावन गणपती मंदिरासमोर ‘ होळी रे होळी पूरणाची पोळी ‘ या गजरात होळी साजरी केली जाते . खण,नारळ अर्पण केले जाते . होळीला नैवेद्य दाखविला जातो . गीता भगत हिने रांगोळी काढून होळीचा परिसर सजवला होता. याप्रसंगी परिसरातील सर्व महिला भगिनी नागरिक रहिवासीयांनी होळीचे पूजन करून होळी उत्सव साजरा केला .




