Breaking
ब्रेकिंग

करमाळा नगरपालिका उर्दू शाळेतील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनच्या वतीने सत्कार व सन्मान

0 8 6 5 0 8

करमाळा नगरपालिका उर्दू शाळेतील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनच्या वतीने सत्कार व सन्मान

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २२/ करमाळा शहरातील कैलासवासी नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळेतील विद्यार्थीनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा करमाळा येथील सामाजिक संस्था मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.

यामध्ये पाचवी तसेच सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल आलीना मझहर पठाण, अक्सा सिकंदर मुलाणी, अशनूर मोहसीन शेख, अलमीजा अनिस कुरेशी, या विद्यार्थिनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरसेवक संजय सावंत हे होते. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जानवडकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना केली. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक संजय सावंत यांनी विद्यार्थ्यांचे मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले व भविष्यात असेच यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या.

तसेच पत्रकार नासिर कबीर व उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मजहर शेख यांची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, मजहर शेख, जुबेर सय्यद सर, पत्रकार अलीम शेख, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, तहसील कार्यालयातील कर्मचारी जहांगीर शेख, इलियास शेख, मौलाना कादर शेख, मोहसीन शेख, अनिस कुरेशी, फैजान शेख, श्रीम. निगार मुंडेवाडी, नाझिया मनुर, फरहाना पठाण, यास्मिन पठाण, आरिफा मोमीन, कौसर हन्नुरे, गजाला मोमीन आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी जुबेर सय्यद यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे