Breaking
ब्रेकिंग

परभणीच्या त्या समाजकंटकांनी जाहीरपणे माफी मागावी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी

0 3 9 0 4 0

परभणीच्या त्या समाजकंटकांनी जाहीरपणे माफी मागावी

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी

एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी

नगर : नगर येथील अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने परभणी येथील संविधानाचे प्रतीकात्मक प्रतीची विटंबना करणाऱ्या त्या समाजकंटकांनी जाहीरपणे माफी मागावी असे निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांना दिले आहे .

दि .१० डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी समोरील विश्वरत्न डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधान शिल्पाची काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक नासधूस केली. उपस्थितांनी एका माथेफिरूला तात्काळ अटक करून पोलिसांच्या स्वाधीन केले.सदर घटनेमुळे आंबेडकरी विचारांचे अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या. बाबासाहेबांच्या संविधानावर आज संपूर्ण देश चालत आहे.परभणी येथील घटनेचा जिल्हा,राज्य व भारत देशात तीव्र पडसाद उमटले आहे.संविधानच्या प्रतिकृतीला हानी पोहोचण्याचे काम काही समाजकंटकाने जाणून बुजून घडवून आणलेले आहे.तरी या निवेदन द्वारे आपणास विनंती करण्यात येते की संविधान पुस्तिकेचे अवमान करणाऱ्या त्या समाजकंटकांनी परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन जाहीर माफी मागावी जेणेकरून भविष्यातही संविधानाला सन्मान मिळेल व समाजात आणि देशात पण एक शांतता असेल.कृपया प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी असे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले .

सदर निवेदन मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य , मा.जिल्हाधिकारी साहेब ( परभणी ) , मा.पोलीस अधीक्षक साहेब ( परभणी ) , मा.पोलिस अधिक्षक साहेब ( अहिल्या नगर ) यांनाही पत्राद्वारे दिल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनिभैय्या खरारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .

या वेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा कार्याध्यक्ष शुभम टाक, सामाजिक कार्यकर्ते आकाश ठाकूर,गोविंद घोडके,दिलीप सुर्यवंशी,विकास पंडित,संजय खरे,धिरज बैद,पवन सेवक आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे